Aaditya Thackeray : मुंबई महानगरपालिकेचे माजी आयुक्त इक्बालसिंग चहल यांची तडकाफडकी बदली
Aaditya Thackeray On Election Commission : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अतिरिक्त सचिव पदावरून गृह विभागाच्या अप्पर मुख्य सचिव पदावर चहल यांची बदली
मुंबई :- मुंबई महानगरपालिकेचे Mumbai BMC माजी आयुक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे CM Eknath Shinde यांचे अतिरिक्त सचिव इक्बालसिंग चहल यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे.चहल यांच्यावर लोकसभेच्या निवडणुकीच्या Lok Sabha Election दरम्यान शिवसेना ठाकरे गटाकडून जोरदार टीका करण्यात आली होती. आदित्य ठाकरे यांनी त्यांच्या बदलीकरीता केंद्रीय निवडणूक आयोगालाही पत्र लिहिले होते. लोकसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान चहल यांची बदली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अतिरिक्त सचिव पदावर करण्यात आली होती. इक्बालसिंह चहल यांच्याकडे आता गृह विभागाचे अप्पर मुख्य सचिव पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. तसेच इक्बालसिंह चहल हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जवळचे अधिकारी मानले जातात.
चहल गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गृह विभागाचे अप्पर मुख्य सचिव म्हणून कार्यभार सांभाळणार आहेत. बदलापूर घटनेनंतर राज्यात संतापाची लाट उसळली असल्याने राज्यभरात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला असून विरोधकांनी देखील सरकारला चांगलेच घेरले आहे. याच पार्श्वभूमीवर इक्बालसिंह चहल यांची तडकाफडकी बदली करण्यात आली असल्याचे बोलले जात आहे.
निवडणूक आयोगाच्या नियमानुसार तीन वर्षांपेक्षा जास्त काळ एकाच पदावर, जिल्ह्यात अथवा मूळ गाव असलेल्या जिल्ह्यात कार्यरत असलेल्या निवडणुकीच्या कामाशी संबंधित अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याचे आदेश आयोगाने दिले होते. याच आदेशानुसार इक्बालसिंह चहल यांची बदली करण्यात आली होती. आता इक्बालसिंह चहल यांच्याकडे गृह विभागाचे अप्पर मुख्य सचिव पदाची तसेच खनिकर्म विभागाचा अतिरिक्त कार्यभार सांभाळण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.