Aaditya Thackeray : आदित्य ठाकरे यांची भाजप पार्टीवर टिका
ओमराजे निंबाळकर यांच्या प्रचारासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे, काँग्रेसचे नेते अमित देशमुख, शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांची उपस्थिती
धाराशिव :- लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. ओमराजे निंबाळकर यांच्या प्रचारासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते माजी मंत्री आदित्य ठाकरे, काँग्रेसचे नेते माजी मंत्री अमित देशमुख, शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांची उपस्थिती होती. आज अनेक ठिकाणी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मला बोलवण्यात आले होते. मात्र, मी केवळ ओमराजे निंबाळकरांसाठी धाराशिव मध्ये आलो असल्याचे आदित्य ठाकरे यांनी सांगितले. या वेळी परिवर्तन घडवायचे आहे हे लोकांनीच ठरवले असल्याचा दावा आदित्य ठाकरे Aaditya Thackeray यांनी केला.
पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेश शेतकऱ्यांनी दिल्लीमध्ये आंदोलन केले. मात्र केंद्र सरकारला त्यांच्याकडे लक्ष द्यायला वेळ नसल्याचे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे. भाजपच्या सरकारने शेतकऱ्यांच्या मार्गावर मोठ मोठे खिळे ठोकले, त्यांना अडवण्यासाठी सर्व प्रयत्न केले. असे सरकार हे, आपले सरकार किंवा शेतकऱ्यांचे सरकार असू शकत नसल्याचे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे. खेकड्याची नांगी आपल्याला देखील ठेचता येते, असे म्हणत आदित्य ठाकरे Aaditya Thackeray यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला.
आज पेट्रोल, डिझेल, गॅस सर्वांचेच दर वाढलेले आहेत. 2014 ला गॅसची दरवाढ झाली तेव्हा आम्ही भाजपसोबत आंदोलन करून लाठ्या खाल्या. मात्र, त्याच भारतीय जनता पक्षाच्या सरकारने आज गॅसचे दर गगणाला भिडवले असल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला आहे. खोटे बोला आणि रेटून बोला, अशा भारतीय जनता पक्षाला मतदान करणार का? असा प्रश्न आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला. शेतकरी जेव्हा मोर्चा काढतो त्यावेळेस त्याला दहशतवादी, आतंकवादी बोलले जात आहे. शहरी आतंकवाद नाव दिले जात आहे. मात्र, लडाक सारख्या ठिकाणी दुसऱ्या देशातील सैन्य घुसत आहे. तिथे मात्र भारतीय जनता पक्ष काही बोलत नसल्याचे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.
भारतीय जनता पक्षामध्ये दोन असे मंत्री आहेत ज्यांच्यावर महिलांवर अत्याचाराचे आरोप आहेत. एका नेत्याने तर खासदार सुप्रिया सुळे यांच्या बद्दल अपशब्द वापरले होते. तर दुसऱ्यावर अनेक गंभीर आरोप असल्याचा आरोप आदित्य ठाकरे Aaditya Thackeray यांनी केला आहे. अशा मंत्र्यांना हाकलून देण्याची आवश्यकता असल्याचे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे. बिल्कीस बाणो प्रकरणाचा उल्लेख देखील आदित्य ठाकरे यांनी यावेळी केला. या प्रकरणात बलात्कार करणाऱ्यांना बाहेर काढण्याचे काम भारतीय जनता पक्षाने केले असल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला आहे. त्यांची जातपात, धर्म कुठलाही असो, तिच्यावर बलात्कार करणाऱ्या व्यक्तीला फाशीच मिळाली पाहिजे, हीच आपली संस्कृती असल्याचा दावा आदित्य ठाकरे यांनी केला आहे.