आदर्श इंग्लिश स्कूलचे कळंब चे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न
कळंब : प्रतिनिधी
मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, आदर्श इंग्लिश स्कूलच्या वार्षिक स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले या संमेलनात एकूण 25 कला सादरीकरण करण्यात आले. ‘मुले आणि पालक ’ या संकल्पनेवर आधारित मोबाईल मुळे होणारे दुष्परिणाम याचे सादरीकरण मुलांनी केले मोबाईलमुळे पालकांचा मुलांशी कमी होत असलेला सुसंवाद नाट्यकेतून चिमुकल्यांनी यावर प्रकर्षाने जाणीव करून दिली. सध्याच्या काळात मुलांना संस्कार देणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमात विविध कलागुणांच्या सादरीकरणाद्वारे प्रेक्षकांची मने जिंकली.प्रसंगी चिमुकल्यांनी सादर केलेल्या देशभक्ती गीत , कोळीगीत, घुमर,पोवाडे,कीर्तन, जोगवा गीतांनी उपस्थितांची वाहवा मिळवली.
विद्यार्थ्यांना त्यांच्या अंगी असणाऱ्या सुप्त गुणांना वाव देण्याच्या उदांत हेतूने आदर्श इंग्लिश स्कूल नेहमीच नाविन्यपूर्ण उपक्रम करत असते यात चिमुकल्यांच्या शैक्षणिक सहली, विज्ञान प्रदर्शन,चित्रकला, क्रीडा, मनोरंजन अशा विविध गुणात्मक संधी विद्यार्थ्यांना प्राप्त करून देण्याचे काम आदर्श इंग्लिश स्कूल कळंब करत असते यावर्षी या वार्षिक स्नेहसंमेलनाचे तेरावे वर्ष या प्रसंगी शिक्षिका स्टाफच्या वतीने कार्यक्रमाचे स्वागत गीत गाण्यात आले. संस्थेची कार्याध्यक्ष श्री गणेश सर, संस्थेच्या प्रशासक सुरेखा ताई करंजकर यांच्या प्रयत्नाने हे कार्यक्रम यशस्वी तिकडे जात आसतात. या कार्यक्रमासाठी शिक्षक कोरिओग्राफर यांचे कार्य देखील मोलाचेच आहे.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक नवनाथ शंकरराव करंजकर यांनी केले यावेळी त्यांनी मागील तेरा वर्षाचा क्रमवार पद्धतीने तपशील सर्वांसमोर मांडला त्याच बरोबर कार्यक्रमाचे अध्यक्ष हनुमंत तात्या मडके यांनी गुणवत्ता ही सुरुवाती पासूनच असावी जेणेकरून विद्यार्थ्यांचा पाया पक्का होईल विद्यार्थी हे लहान गटाचे असल्यामुळे यांच्या शिकवण्याच्या काठीण्य पातळी पण वेगळ्या पद्धतीचे आहेत विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रातही आपले नाव उंचवावे याप्रसंगी ते बोलून गेले. या कार्यक्रमाचे उद्घाटक फॅक्चर तज्ञ डॉक्टर सुशीलकुमार ढेगळे साहेब यावेळी उपस्थित होते या कार्यक्रमात साठी प्रमुख पाहुणे सौ,सीमा संभाजी कोळी मॅडम या पुणे येथून आपल्या ग्रामीण भागातल्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे कौतुक पाहण्यासाठी आल्या आणि त्यांच्या कडून कौतुकाची थाप शाळेला मिळाली. या कार्यक्रमाचे आभार संस्थेचे सचिव श्री ज्ञानेश्वर तोडकर सर यांनी मांडले.. या कार्यक्रमाच्या यशस्वी तेथे साठी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वृंदांचे देखील आभार मानण्यात आले.