वाघोली येथे एक तडीपार आरोपी जेरबंद ; गुन्हे शाखा युनिट ६ ची कामगिरी
आज रोजी गुन्हे शाखा युनिट 6 हद्दीमध्ये पोलीस अधिकारी व अंमलदार असे गुन्हे प्रतिबंधक गस्त करत असताना ऋषीकेश व्यवहारे यांना बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, रेकॉर्ड वरील तडीपार गुन्हेगार नामे श्यामकांत विष्णू सातव वय ४० रा. डोमखेल वस्ती, आव्हाळवाडी, ता हवेली, जि पुणे येथे राहते घरी आला आहे अशी खात्रीशिर बातमी मिळाल्याने त्यास ताब्यात घेतले आहे.
सदर आरोपी सराईत गुन्हेगार असल्याने त्यास तडीपार आदेश क्र. 38/2024 नुसार मुंबई पोलीस अधिनियम कलम 56 (1),(अ)(ब) प्रमाणे दि. 12/08/2024 रोजी पासुन दीड वर्षासाठी पुणे शहर आयुक्तालय, पुणे व पिंपरी चिंचवड आयुक्तालय जिल्हयाच्या हद्दीतुन तडीपार केले होते. आज रोजी तो मिळून आल्याने त्याचे विरुध्द महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 142 अन्वये वाघोली पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करून पुढील तपास करणेकामी वाघोली पोलीस स्टेशनचे स्वाधीन करण्यात आले आहे.
सदरची कामगीरी मा.पोलीस उपआयुक्त (गुन्हे) श्री निखिल पिंगळे, मा. सहा.पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री राजेंद्र मुळीक गुन्हे शाखा, युनिट -6 चे प्रभारी पोलीस निरीक्षक वाहिद पठाण यांचे मार्गदर्शनाखाली ऋषीकेश व्यवहारे, नितीन धाडगे, सुहास तांबेकर, गणेश डोंगरे, किर्ती नरवडे, प्रतीक्षा पानसरे यांनी केली आहे.