Maharashtra Navnirman Sena Anniversary: अठरा वर्षाचा खडतर प्रवास ; महाराष्ट्र नवनिर्माण सेना वर्धापन दिन
•महाराष्ट्र नवनिर्माण सेना यंदाचा 18 वा वर्धापन दिन नाशिक मध्ये करणार आहे
नाशिक :- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा यंदाचा 18 वा वर्धापन दिन नाशिक येथे करणार आहे. या वर्धापन दिनानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या अधिकृत सोशल हँडलवर अठरा वर्षाचा खडतर प्रवास असा टॅगलाईन देत राज ठाकरे यांनी आतापर्यंत घेतलेला भूमिका त्यांनी केलेले आंदोलन पक्षाला आलेल्या चढ-उतार याचा चित्रीकरण करणारा व्हिडिओ शेअर केला आहे. 2006 पासून राज ठाकरे यांनी शिवसेना पक्षाला जय महाराष्ट्र करत महाराष्ट्रभर आपला झंजावात पेटवत महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्थापना केली होती सुरुवातीच्या काळाला राज ठाकरे यांना प्रचंड यश आले 2009 च्या विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये राज ठाकरे यांना तब्बल 13 आमदार निवडून आणण्यात यश आले त्यानंतर मुंबई महानगरपालिकेमध्ये विरोधी पक्ष गटावर राज ठाकरे यांनी दावा केला नाशिक महानगरपालिका राज ठाकरे यांनी सत्ता काबीज केली आणि पहिला महापौर म्हणून नाशिक येथे महाराष्ट्र निर्माण सेना यांचा बसला होता. पुणे महानगरपालिकेवरही विरोधी बाकावर शक्तिशाली पक्ष म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेना सुरुवातीच्या काळात अतिशय जोरदार होती. Maharashtra Navnirman Sena Anniversary
राज ठाकरे यांचा झंजावात संपूर्ण महाराष्ट्रात भेटत असताना त्यानंतर पक्षाला आलेली गळती पक्षातील महत्त्वाचे नेते यांनी पक्षाला केलेला जय महाराष्ट्र आणि राज ठाकरे यांना तिन्ही निवडणुकीत आलेले अपयश या सर्व घडामोडीनंतर यंदाच्या 18 व्या वर्धापनदिनी राज ठाकरे आपली काय भूमिका मांडणार महायुतीमध्ये सहभागी होणार का स्वातंत्र्य लोकसभा आणि विधानसभा निवडणूक लढवणार याकडे पाहावे लागेल. आज भाषणात राज ठाकरे पक्षाची पुढील वाटचाल आणि भूमिका स्पष्ट करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. Maharashtra Navnirman Sena Anniversary
महाराष्ट्र नवनिर्माण सेना अधिकृत पेजवर पोस्ट केलेला व्हिडिओ
18 वर्षांचा प्रवास खडतर होता पण प्रखर नेतृत्वाला कणखर निष्ठेची साथ मिळाली. अन् राजसाहेबांनी सर्वसामान्य घरातून येणाऱ्या सहकाऱ्यांना सोबतीला घेऊन स्वतःच्या बळावर राजकीय पक्ष उभा केला, नवा विचार मांडला आणि प्रस्थापितांसमोर तुल्यबळ आव्हान उभं केलं ! Maharashtra Navnirman Sena Anniversary