Zeeshan Siddiqui join Ajit Pawar’s NCP? : निवडणुकीपूर्वी काँग्रेसला मोठा धक्का! झीशान सिद्दीकी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत जाणार?
Zeeshan Siddiqui join Ajit Pawar’s NCP? : काही महिन्यात राज्यात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. निवडणुकीपूर्वी काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का बसू शकतो. झीशान सिद्दीकी आज अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करू शकतात.
मुंबई :- विधानसभा निवडणुकीपूर्वी Vidhan Sabha Election काँग्रेसला Congress. आणखी एक मोठा धक्का बसू शकतो. आमदार झीशान सिद्दीकी MLA Zeeshan Siddiqui हे बंडखोर होऊ शकतात. ते आज अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करू शकतात. त्यांचे वडील बाबा सिद्दीकी यांनी आधीच काँग्रेस सोडून अजित पवार यांना पाठिंबा दिला आहे.आज मुंबईत काढण्यात येणाऱ्या अजित पवारांच्या जन सन्मान यात्रेत झीशान सिद्दीकी यांचे पोस्टर्सही पाहायला मिळाले आहेत. मात्र, काँग्रेसने अद्याप त्यांची पक्षातून हकालपट्टी केलेली नाही. पण आज काही कारवाई होऊ शकते.
मुंबईतील वांद्रे (पूर्व) येथून प्रथमच आमदार झालेले झीशान सिद्दीकी हे महाराष्ट्राचे माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांचे पुत्र आहेत. त्यांचे वडील बाबा सिद्दीकी यांनी फेब्रुवारीच्या सुरुवातीला काँग्रेसचा राजीनामा दिला आणि अजित पवार AjitPawar यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. झीशान सिद्दीकी यांच्या वडिलांचे प्रवेशानंतर त्यांना काँग्रेस युवा संघटनेतून हकालपट्टी करण्यात आली होती.