पुणे

Baramati Lok Sabha Election : बारामती विधानसभा कार्यक्षेत्रातील काँग्रेस पक्षाच्या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांची निरीक्षक विजय जाधव यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न

Lok Sabha Election : दौंड, ता. ११ आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बारामती विधानसभेच्या निरीक्षक पदी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी Baramati Congress Comity कडून विजय जाधव यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली असून यानिमित्ताने बारामती काँग्रेस भवन येथे पुणे जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा पुरंदर हवेलीचे आमदार संजय जगताप भोर मुळशी वेल्ह्याचे आ. संग्राम थोपटे यांच्या सूचनेप्रमाणे महत्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीदरम्यान विधानसभा क्षेत्रातील काँग्रेस पक्षाचे प्रदेश जिल्हा तालुका शहर विभागातील पदाधिकारी व सामाजिक क्षेत्रात काम करणारे प्रतिनिधी मान्यवर सामाजिक संघटनेचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. Baramati Lok Sabha Election News

बारामती विधानसभेचे Baramati Lok Sabha निरीक्षक विजय जाधव यांनी बूथ कमिटी, बी, एल, ए मंडल प्रभाग कमिटी अत्यंत महत्त्वाची असून या सर्व कमिट्या आगामी काळात तयार करण्यासाठी युद्धपातळीवर काम चालू करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या निमित्ताने बारामती तालुका काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष राजेंद्र निंबाळकर, बारामती शहर काँग्रेसचे अध्यक्ष अशोक इंगवले, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव वीरधवल गाडे, माजी अध्यक्ष बारामती काँग्रेस बाळासाहेब देवकाते, बारामती तालुका असंघटित कामगार कर्मचारी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष विराज जाधव, बारामती तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष वैभव बुरुंगले, पुणे जिल्हा काँग्रेस पक्षाच्या कामगार विभागाचे सरचिटणीस संग्राम जाधव, उपाध्यक्ष अशोक चिव्हे, कलाशिक्षक श्रीराम सावंत, अनिल शिंदे, बारामती मूर्तीमोडवे राजेंद्र जगदाळे, बारामती शहर काँग्रेसचे सचिव भारत रामचंद्रे, बारामती युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष सुशांत सोनवणे, माजी युवक काँग्रेस शहराध्यक्ष योगेश महाडिक, युवक काँग्रेसचे सरचिटणीस निलेश गजरमल, दिपक शिंदे, बारामती काटेवाडी चे प्रकाश गायकवाड, सिद्धेश गवळी आदी मान्यवर पदाधिकारी यावेळी उपस्थित होते Baramati Lok Sabha Election News

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0