Pune Crime News | खुनातील आरोपी १ तासात गजाआड : मुंढवा पोलीसांची तत्परतेने कारवाई
- Pune Crime News | शुल्लक कारणावरून सिमेंट ब्लॉकने ठेचून खून
- वपोनि महेश बोळकोटगी यांच्याकडून गांभीर्यपूर्वक तपास
पुणे, दि. ११ जून, महाराष्ट्र मिरर : (मुबारक जिनेरी)
मुंढवा परिसरात पाणी मागितल्याचा राग आल्याने झालेल्या मारहाणीत एकाचा खून झाल्याचा धक्कादायक प्रकार मुंढवा पोलिसांनी उघडकीस आणला आहे. फरार होण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीस मुंढवा पोलिसांनी १ तासात गजाआड करत तत्पर कारवाई केली आहे. (Pune Crime News)
मयत श्रीकांत निवृत्ती अल्हाट, वय ४२ वर्षे, असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर आरोपी राकेश तुकाराम गायकवाड यास पोलिसांनी अटक केली आहे.
मयत श्रीकांत निवृत्ती अल्हाट याचा भाऊ संतोष निवृत्ती अल्हाट याने त्याचा मामे भाऊ राकेश तुकाराम गायकवाड याचे विरुध्द खुनाची तक्रार दिल्याने मुंढवा पोलीस स्टेशन Mundhwa Police Station येथे २४३/२०२४, भा.दं.वि. कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत अधिक माहिती अशी कि, दि. १० जून रोजी रात्रौ मुंढवा मार्शल वरील कर्मचारी यांना आनंद निवास, कामगार मैदान जवळ, अर्धवट बांधकाम चालु असलेल्या घरामध्ये एक इसम जखमी आवस्थेत पडला असल्याचा कॉल नियंत्रण कक्ष येथुन प्राप्त झाला. सदर कॉल प्राप्त होताच मुंढवा पोलीस स्टेशन कडील रात्रगस्त अधिकारी व अंमलदार हे घटनास्थळी पोहचले. त्यांनी सदरची परिस्थीती पाहुन जखमी इसमाची महिती घेण्यास सुवारत केली असता. सदर जखमी इसमाचा भाऊ नामे संतोष निवृत्ती अल्हाट यांनी जखमी हा त्याचा भाऊ असुन त्याचे नाव श्रीकांत निवृत्ती अल्हाट वय ४२ वर्षे, असे असल्याचे पोलीसांना सांगितले. पोलीसांनी तात्काळ जखमी इसमास अॅब्युलन्सने पुढील औषध उपचार कामी ससुन हॉस्पीटल येथे घेवुन आले परंतु श्रीकांत निवृत्ती अल्हाट हा उपचार पुर्वी मयत झाल्याचे ससुन हॉस्पीटल डॉक्टरांनी घोषीत केले होते. त्यांनतर श्रीकांत अल्हाट याचे ससुन डेड हाऊस येथे पोस्ट मॉर्टेम होऊन त्याचे मरण हे डोक्याल्या गंभीर जखम व अंगावर इतर ठिकाणी जखमा होवुन मयत झाल्याचे निष्पण झाले.
सदर प्रकाराबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बोळकोटगी Sr.Pi. Mahesh Bolkotgi यांना माहिती मिळताच बातमीदारा मार्फत माहिती प्राप्त करुन तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. तपास दरम्यान श्रीकांत निवृत्ती अल्हाट हा दिनांक ९/०६/२०२४ रोजी रात्री १०.३० वा.चे सुमारास मयत श्रीकांत हा त्याचा मामे भाऊ राकेश तुकाराम गायकवाड याचे कडे पाणी मागण्यासाठी गेला असता त्यावेळी राकेश व श्रीकांत यांच्या मध्ये वादीवाद होवुन भांडणे सुरु झाली त्याच भांडणामध्ये राकेश गायकवाड यांनी श्रीकांत अल्हाट यास सिमेंटच्या दगडाने व विटेने व लोखंडी गजाने मारले अशी माहिती मिळाली. त्यावेळी मयत श्रीकांत निवृत्ती अल्हाट याचा भाऊ संतोष निवृत्ती अल्हाट याने त्याचा मामे भाऊ राकेश तुकाराम गायकवाड याचे विरुध्द खुनाची तक्रार दिल्याने मुंढवा पोलीस स्टेशन येथे २४३/२०२४, भा.दं.वि. कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल होताच. मुंढवा पोलीस स्टेशन कडील एकुण ३ पथके व तपास पथक मधील अधिकारी व अंमलदार यांनी ०१ तासाच्या आत गुन्हयातील आरोपी नामे राकेश तुकाराम गायकवाड याचे मुसक्या आवळुन त्यास जेरबंद केले आहे.
सदरची कामगिरी पोलीस आयुक्त, अमितेश कुमार Pune Police CP Amitesh Kumar, पुणे शहर, पोलीस सह आयुक्त, प्रविण पवार, पुणे शहर, अपर पोलीस आयुक्त, प्रविण पाटील, पश्चिम प्रादेशिक विभाग अतिरिक्त कार्यभार पूर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर, यांचे सुचना प्रमाणे, मा. पोलीस उप आयुक्त, आर राजा, परिमंडळ-५, अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग पुणे मनोज पाटील, पोलीस उपायुक्त आर. राजा परिमंडळ ५ पुणे शहर, मा. सहा पोलीस आयुक्त, अश्विनी राख, हडपसर विभाग पुणे शहर यांच्या मार्गदर्शनखाली, मुंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, महेश बोळकोटगी, सहा. पोलीस निरीक्षक संजय माळी, पो उप निरीक्षक अनिल बिनवडे, पो उप निरीक्षक महादेव लिंगे म.पो उप निरीक्षक शुभांगी मगदुम, पोलीस अंमलदार संतोष जगताप, तुळशीराम रासकर, दिनेश भांदुर्गे, राजु कदम, दत्ताराम जाधव, रविंद्र देवढे, योगेश गायकवाड, जगदिश महानोर, किरण बनसोडे, राहुल मोरे, सचिन पाटिल, स्वनिल रासकर निलेश पालवे, दयानंद गायकवाड, यांनी केली आहे.