Mumbai Crime News : कौटुंबिक वादातून तीन जण जखमी,एकाचा मृत्यू.. चुनाभट्टी मधील घटना
चुनाभट्टी पोलिसांची कामगिरी ; कौटुंबिक वादातून निर्माण झालेले हिंसेतील पोलिसांनी तात्काळ सात आरोपींना केले अटक
मुंबई :- कौटुंबिक वादातून निर्माण झालेले हिंसा आणि त्यानंतर एकाच कुटुंबातील जवळपास चार जणांवर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. या घटनेत अदनान सलीम कुरेशी (24 वर्ष) यांचा जागीच मृत्यू झाला आहे. यामध्ये आरोपींच्या विरोधात चुनाभट्टी पोलीस ठाण्यात कलम 302 307,324,323,504,506(2),143,144,147,149,34 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. घडलेल्या घटनेबाबत पोलिसांनी सकल चौकशी करत सात आरोपींना अटक करण्यात आली आहे.
कौटुंबिक वादातून प्राणघात खाल्ला, तीन जखमी एकाचा मृत्यू सात आरोपींना अटक
कौटुंबिक वादातून झालेल्या हल्ल्यात अदनान सलीम कुरेशी, (24 वर्ष) याचा मृत्यू झाला आहे.आरीफ उमर खान, (29 वर्ष), इमरान सलीम कुरेशी (19 वर्ष), आसिफ आर खान (32 वर्ष) यांच्यावर प्राणघात हल्ला करून जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार चालू आहे.
या घटनेनंतर पोलीस ऍक्शन मोडवर येत चुनाभट्टी पोलीसांनी आतापर्यंत अमन मोहंमद शमिम खान, (20 वर्ष) मोहमद अनस युनूस शेख, (28 वर्ष) समा अनस शेख, (28 वर्ष) सना अमन खान, (31 वर्ष),शकील अहमद बाबू रजा शेख, (23 वर्ष), हुसेना बानो युनूस शेख, (49 वर्ष), सलमान मोहम्मद शमीम शेख, (25 वर्ष) अशा सात आरोपींना पोलिसांनी अटक करण्यात आली असून त्यांना न्यायालयासमक्ष हजर केले आहे.
पोलीस पथकाकडून सात आरोपींचा छडा
अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग डॉ. महेश पाटील, पोलीस उप आयुक्त, हेमराजसिंह राजपूत, चुनाभट्टी पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंकुश गायकवाड यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक (गुन्हे) विक्रम चव्हाण, गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नवनाथ काळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदिप पाटिल, सहाय्यक पोलीस निरीक्षक झोटिंग, सहाय्यक पोलीस निरीक्षक ढमरे, पोलीस उपनिरीक्षक हर्षदा पाटील व पथक यांनी सात आरोपींना अटक करून संपूर्ण प्रकरणाबाबत उलगडा करत आहेत.