पुणे

Daund News : निकालाच्या अगोदरच विजयाचे बॅनर; अतिउत्साही कार्यकर्त्याचा नादच खुळा !

भाऊबीजेसाठी भावाकडून बहिणीला ५ हजार ५०० मतांची भेट

( दौंड प्रतिनिधी हरिभाऊ बळी )
दौंड, ता. २९ बारामती लोकसभा मतदारसंघात ७ मे रोजी मतदान पार पडले. निवडणुकीत आक्रमक प्रचार झाला. दौंड विधानसभा मतदार संघातील प्रश्न यावर भर दिला गेला होता. आता मतमोजणी ४ जून रोजी होणार आहे. सर्व उमेदवारांचे नशीब मतपेटीत कैद झालेले असताना दौंड विधानसभा मतदारसंघातील खामगाव येथे बारामती लोकसभा मतदारसंघामधील राष्ट्रवादी काँग्रेस ( शरद पवार गटाचे ) उमेदवार सुप्रिया सुळे यांची खासदारपदी बहुमताने विजय भव: अशा आशयाचे बॅनर झळकू लागले आहे.

विशेष म्हणजे या बॅनर वर भावाकडून बहिणीला संपूर्ण दौंड तालुक्यातून ५ हजार ५०० मतांची भेट अशा आशयाचे बॅनर खामगाव ( गाडीमोडी फाटा ) येथे झळकू लागल्याने सर्वसामान्य नागरिकांमधून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. माञ निकाला आधीच अतिउत्साही कार्यकर्ते विलास नागवडे यांनी हे बॅनर लावल्याने दौंड विधानसभा मतदारसंघात चर्चेचा विषय ठरला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0