Panvel Crime News : प्रेसनेम प्लेट लावून अवैध धंदे

•पनवेल मधील काळे धंदे करणाऱ्यांनी घेतला पोलीस आणि पत्रकारांचा आश्रय
पनवेल जितिन शेट्टी :- पोलीस आणि पत्रकार आपल्या वाहनांवर पार्किंगच्या सोयीकरिता प्रेस आणि पोलीस याचा उल्लेख केला जातो. जेणेकरून एखाद्या महत्त्वाच्या ठिकाणी त्यांची गाडी पार करता यावे या मार्गचा मुख्य हेतू असतो. परंतु सध्या नवी मुंबई आणि पनवेल परिसरात गुन्हेगारी क्षेत्र निगडित असलेल्या भामट्यांनी पत्रकार आणि पोलिसांच्या पाट्यांचा वापर सर्रास आपले काळे व्यवसाय चालू ठेवले आहे.
आश्चर्याची गोष्ट एवढी की अशा प्रकारच्या गाड्या शहरात वाढल्या असून पोलिसांकडून विचारपूस केली असता अमुक अमुक व्यक्ती पोलीस किंवा अमुक अमुक पत्रकार संस्थेत काम करत असल्याचे खोटी माहिती देऊन कारवाईच्या दिशाभूल करत असतात. रात्रीच्या वेळेस या पाट्यांचा फायदा घेत आपले काळे कृत्य रात्रीच्या अंधारात करत असतात. पोलीस यावर लवकरच कायदेशीर कारवाई करणार आहे.