महाराष्ट्र

Maharashtra Weather Update : उष्णतेपासून मिळणार आराम! येत्या 48 तासांत महाराष्ट्रातील या भागात पाऊस पडू शकतो

Maharashtra Weather Update : 28 आणि 29 मे रोजी कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात वेगवेगळ्या ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्याचबरोबर काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा इशाराही देण्यात आला आहे.

मुंबई :- येत्या काही तासांत महाराष्ट्रातील अनेक भागात मुसळधार पावसाची Heavy Rain शक्यता आहे. भारतीय हवामान खात्याच्या Indian Weather Forcast Team अंदाजानुसार, येत्या 48 तासांत महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मुंबई, ठाणे आणि कोकणात आज दिवसभर उकाडा जाणवत असला तरी येत्या काही तासांत पावसाची शक्यता आयएमडीने वर्तवली आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगडमध्ये तुरळक पाऊस पडू शकतो. Maharashtra Weather Update

हवामान खात्याच्या अंदाजानुसार 28 आणि 29 मे रोजी कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची आणि काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे.

राज्यात आज आणि उद्या कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाची शक्यता आहे. IMD च्या अंदाजानुसार, कोकणात काही ठिकाणी पाऊस किंवा मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस अपेक्षित असून, त्यामुळे नागरिकांना उष्णतेपासून दिलासा मिळण्याची शक्यता आहे.29 मे रोजी कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडू शकतो, असेही हवामान खात्याने म्हटले आहे. Maharashtra Weather Update

चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी येथे सोमवारी (27 मे) 47.1 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली, जे राज्यातील सर्वाधिक तापमान आहे. मंगळवारीही या भागाचे तापमान असेच होते. भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या (IMD) अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे. आयएमडीने दिलेल्या ताज्या माहितीनुसार, ब्रह्मपुरी वगळता विदर्भात अनेक ठिकाणी कमाल तापमान 40 अंशांच्या वर नोंदले गेले आहे.

Web Title : Maharashtra Weather Update : Relief from heat! In the next 48 hours, there may be rain in these parts of Maharashtra

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0