मुंबई

Panvel Breaking News : खारघरची वाहतूक कोंडी फुटणार! सेक्टर २ पासून महामार्गाला जोडणाऱ्या जोडरस्त्याचे काम सुरु ! आमदार प्रशांत ठाकूर यांचे प्रशासनाला निर्देश ! कीर्ती नवघरे यांच्या पाठपुराव्याला यश !

पनवेल : खारघर शहरातील वाहतूक कोंडी आता लवकरच फुटणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून खारघर सेक्टर २ पासून पनवेल – सायन महामार्गाला जोडणाऱ्या रस्त्याचे काम सुरु झाले आहे. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली भाजप रायगड सचिव कीर्ती नवघरे यांनी पीडब्ल्यूडी प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर सदर काम मार्गी लागले आहे.

खारघर शहरातील वाढती लोकसंख्या आणि दिवसागणिक वाढणारी वाहनांमुळे वाहतुकीची मोठी समस्या निर्माण झाली आहे. दिवसागणिक मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. खारघर शहराच्या दोन्ही बाजूने पनवेल – सायन महामार्गाला जाताना वाहतुकीची मोठी कोंडी होते. त्यामुळे अपघातांची संख्या देखील वाढत आहे. वाहन चालकांमध्ये वाद देखील होत आहे. वाहतूक कोंडीच्या प्रश्नावर कीर्ती नवघरे यांनी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली सार्वजनिक बांधकाम विभागाकडे मागणी करीत पाठपुरावा सुरु केला. खारघर सेक्टर २, ७, व १० येथून मुख्य महामार्गाला जोडरस्ता द्यावा, अशी मागणी कीर्ती नवघरे यांनी केली होती. खारघर वाहतूक पोलीस निरीक्षक अशोक गावडे, माजी नगरसेविका आरती नवघरे, माजी नगरसेवक नरेश ठाकूर यांनी देखील त्यावेळी मोठे सहकार्य केले. सदर प्रश्नाची दखल घेत पीडब्ल्यूडी विभागाने खारघर २ कडून पनवेल – सायन महामार्गाला जोडणाऱ्या रस्त्याचे काम सुरु केले आहे.

Panvel Breaking News

त्यामुळे खारघर सेक्टर २, ८, १० आणि कोपराकडून सीबीडी – बेलापूर आणि पुढे जाणाऱ्या वाहनांचा खारघर हिरानंदानी येथील एक्सिटवर पडणारा ताण मोठ्याप्रमाणात कमी होणार आहे. त्यामुळे वाहतुकीचो कोंडी कमी होईल, असा विश्वास कीर्ती नवघरे यांनी कोकण दर्पणशी बोलता व्यक्त केला. खारघर सेक्टर ७ व १० कडून मुख्य महामार्गाला जाणारा रस्ता लवकरच जोडला जाऊन वाहतुकीची कोंडी आणखी कमी होऊन खारघर शहरातील वाहतुकीचा प्रश्न मोठ्या प्रमाणात सुटेल, असा विश्वास कीर्ती नवघरे यांनी व्यक्त केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0