Bhayandar Crime News : सराईत गुन्हेगाराला अटक, चोरी केलेले मोबाईल चोर बाजारात विकत असं…
Bhayandar Crime News : भाईंदर पोलिसांचे मोठी कारवाई ; सराईत चोरट्याला केले अटक, रात्रीच्या वेळीस भिंतीस भगदाड पाडून घरात/दुकानात करत होता चोरी
भाईंदर :- भाईंदर पोलीस ठाण्याच्या Bhayandar Police Station हद्दीत एका मोबाईलच्या दुकानात रात्रीच्या वेळी भिंतीला भगदाड पाडून दुकानांमध्ये प्रवेश केला आणि दुकानातील मोबाईल, ब्लूटूथ, वॉच, रिपेरिंग करीत आलेले मोबाईल जवळपास दोन लाख 61 हजार 451 रुपयाचा मुद्देमाल चोरटा दुकान फोडून चोरी केले होते. यासंदर्भात दुकान मालकाने भाईंदर पोलीस ठाण्यात Bhayandar Police Station कलम 380,454,457,411 प्रमाणे पुन्हा दाखल केला असून ही घटना 26 एप्रिल च्या मध्यरात्री घडली होती. Bhayandar Crime News
या घटने संदर्भात वरिष्ठांच्या सूचनेप्रमाणे भाईंदर पोलिसांनी घटनास्थळी प्रत्यक्ष पाहणी करून सीसीटीव्ही फुटेज च्या मदतीने पोलिसांनी संशयित आरोपीचा फोटो प्रसिद्ध केला होता. पोलिसांच्या गुप्त बातमीदाराने आरोपी हा दोन टाकी डंक्कन रोड, फुटपाथ मुंबई मध्ये असल्याचे माहिती मिळाली होती. पोलिसांनी सापळा रचून मोठ्या शिताफीने आरोपीला 30 एप्रिला अटक केली होती.अटक आरोपी याचेकडे पोलीस कोठडी दरम्यान तपास केला असता त्याने गुन्हयात चोरी केलेले रिपेअरींग करीता आलेले जुने मोबाईल फोन व स्मार्ट वॉच हे त्याने मुंबईतील चोर बाजारात विक्री करीता दिले होते. तसेच नवीन मोबाईल फोन हे आरोपी नामे अब्दुल रहीम खलील शेख (रा. मुसाफिर खाना मजिद बंदर मुंबई) याला विकले होते. आरोपीने कोलकाता येथे विक्रीकरीता त्याचे भावाचे नावे कुरीयर ने पाठविले होते. गुन्हयात चोरीस गेलेले 35 मोबाईल्स फोन, 7 स्मार्ट वॉच, असा एकूण 2 लाख 32 हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात भाईंदर पोलीस गुन्हे प्रकटीकरण कक्षास यश आले आहे. अटक दोन्ही आरोपी हे सध्या न्यायालयीन कस्टडीमध्ये असुन नमुद गुन्हयाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रसाद गोवले हे करीत आहे. Bhayandar Crime News
प्रकाश गायकवाड, पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ 01, दिपाली खन्ना, सहाय्यक पोलीस आयुक्त, भाईंदर विभाग, सुर्यकांत नाईकवाडी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, भाईंदर पोलीस ठाणे, विवेक सोनवणे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहा. पोलीस निरीक्षक माणिकराव कतुरे, पोलीस उपनिरीक्षक प्रसाद गोयले, पोलीस हवालदार रविंद्र भालेराव, राजेश श्रीवास्तव, किरण पी. पवार, किरण आर, पवार, सुशिल पवार, पोलीस नाईक रामनाथ शिंदे, संजय चव्हाण, सलमान पटवे, जयप्रकाश जाधव नेम परिमंडळ 1 कार्यालय यांनी केलेली आहे. Bhayandar Crime News