Mumbai Police News : घरमालकांकरिता पोलिसांकडून नियमावली ;मुंबईत भाडेकरूंना घर देताना मालकांने पोलिसांना कळविणे बंधनकारक
Mumbai Police Latest News : पोलीस उप आयुक्त अकबर पठाण यांनी घरमालकांकरिता सक्तीचे आदेश
मुंबई :- घरमालकांनो (Mumbai House Owner) या नियमानाचे पालन न केल्यास कारवाई होऊ शकते. पोलीस उप आयुक्त अकबर पठाण यांनी निर्देश देत शहरातील सर्व घरमालकांना घर भाड्याने(Rent Room ) देताना काळजीपूर्वक भाडेकरार करावा आणि त्या संदर्भात पोलिसांना कळवावे असे नियमन बनवण्यात आले आहे. देशात दहशतवाद्यांची संख्या वाढत असून हे दहशतवादी विविध शहरात नावे बदलून वास्तव्य करत असतात अशातच मुंबईत कोणत्याही घातपात करण्याच्या उद्देशाने एखादे व्यक्ती असे नाव बदलून राहणार असेल तर मुंबई पोलिसांकडून सतर्कतेसाठी मालकाला भाडेकरार केल्यानंतर पोलिसांना कळविणे बंधनकारक राहील. हॉटेल,लॉज,घर जागा, गेस्ट हाउस कोणालाही भाड्यांन देणार असाल तर घर मालकाला किंवा जागे मालकाला संपूर्ण माहिती पोलिसांच्या पोर्टलवर देणे बंधनकारक राहील. तसेच परदेशातून एखादा व्यक्ती भाड्यावर येणार असेल तर त्याला पासपोर्ट व्हिजा पोलिसांना देणे बंधनकारक राहील. www.mumbaipolice.in. tenant form सिटीजन पोर्टलवर माहिती देणे बंधनकारक राहणार आहे. तसेच कोणीही नियमाचे उल्लंघन केल्यास भारतीय दंड संहिता 1860, 188 कलम प्रमाणे गुन्हे दाखल करून संबंधित व्यक्तीवर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिस उप आयुक्त अकबर पठाण यांच्याकडून नोटिस बजावली आहे.10 मे ते 8 जुलै या कालावधी करिता कलम 188 प्रमाणे नियमाचे उल्लंघन करणाऱ्या विरोधात पोलिसांकडून कारवाई करण्यात येईल. असे नियमावली पोलिसांनी जाहीर केले आहे तसेच सर्व घरमालकांनी तसेच हॉटेल व्यवसायक यांनी पोलिसांना कळवावे असे सांगण्यात आले आहे. Mumbai Police News