Maharashtra Phase 3 Voting Update : राज्यात दुपारी 3 वाजेपर्यंत किती मतदान? या जागेवर मतदान, जाणून घ्या 11 जागांची स्थिती
पुणे :- राज्यात दुपारी 3 वाजेपर्यंत 42.63 टक्के मतदान झाले. राज्यात आज संध्याकाळी 6 वाजेपर्यंतच मतदान होणार आहे. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात सर्वात कमी मतदान झाले आहे. महाराष्ट्रात सर्वात कमी मतदान बारामतीमध्ये 34.96 टक्के आणि सर्वाधिक 49.94 टक्के मतदान हातकणंगले मतदारसंघात झाले. Maharashtra Lok Sabha Live Update
राज्यात मतदानासाठी आता जवळपास तीन तास उरले आहेत. 11 जागांवर आज सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदान होणार आहे. महाराष्ट्रात सकाळी 7 वाजल्यापासून मतदान सुरू आहे. राज्यात आज तिसऱ्या टप्प्यासाठी मतदान होत आहे. महाराष्ट्रात आतापर्यंतच्या ट्रेंडनुसार दुपारी 1 वाजेपर्यंत 44.67 टक्के मतदान झाले आहे. Maharashtra Lok Sabha Live Update
दुपारी 3 वाजेपर्यंत 42.63 टक्के मतदान
लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यातील 11 मतदारसंघांसाठी होणाऱ्या निवडणुकीत दुपारी 3 वाजेपर्यंत 42.63 टक्के मतदान झाले. Maharashtra Lok Sabha Live Update
मतदानाची मतदारसंघनिहाय टक्केवारी खालीलप्रमाणे
लातूर – 44.48 टक्के
सांगली – 41.30 टक्के
बारामती – 34.96 टक्के
हातकणंगले – 49.94 टक्के
कोल्हापूर – 51.51 टक्के
माढा – 39.11 टक्के
उस्मानाबाद – 40.92 टक्के
रायगड – 41.43 टक्के
रत्नागिरी – सिंधुदूर्ग – 44.73 टक्के
सातारा – 43.83 टक्के
सोलापूर – 39.54 टक्के