Thane Crime News : 13 वर्षीय बालकीचे अश्लील व्हिडिओ काढणाऱ्या नराधमाला पोलिसांनी केले अटक
सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुणींची करत होता फसवणूक, अश्लील व्हिडिओ काढणारे आरोपीला पोलिसांनी केले गजाआड
ठाणे :- सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुणची फसवणूक करणाऱ्या आणि त्यांच्या अश्लील चित्रफिती काढणाऱ्या नराधमाला पोलिसांनी अटक केले आहे.(दिनांक 31 मार्च 2024) रोजी त्यापुर्वी गुन्ह्यातील आरोपी रोहीत कुमार, (मुळ राहणार पत्ता मिर्जापुर, सारन, बिहार) यावरून नमुद गुन्ह्यातील 13 वर्षाची पिडीत मुलीचे नग्न अवस्थेतील व्हिडीओ पिडीत मुलीचे नातेवाईक व इतरांचे मोबाईल फोनवर व्हॉट्सॲपचे माध्यमातून व्हायरल केला. तसेच पिडीत मुलीला वारंवार व्हॉट्सॲपद्वारे मेसेज करून त्याचे सोबत चॅटींग केली म्हणुन वरील पिडीत मुलीचे मोठ्या बहीणीने दिलेले तक्रारीवरून वर्तकनगर पोलीस ठाण्यात भा.दं.वि.सं. कलम 354 (क) सह माहिती व तंत्रज्ञान अधिनियम २००० चे कलम 66(3), 67 (वी) सह लैंगिक अपराधापासुन बालकांचे संरक्षण अधिनियम 2012 चे कलम-12 प्रमाणे दिनांक 1 एप्रिल 2024 रोजी दाखल झाला आहे.
गुन्हा हा अल्पवयीन मुलीशी संबंधीत व गंभीर स्वरूपाचा असल्याने सदर गुन्हयासंबधी आशुतोष हुंबरे पोलीस आयुक्त, ठाणे शहर, डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण , पोलीस सह आयुक्त, ठाणे शहर, विनायक देशमुख,अपर पोलीस आयुक्त,पश्चिम प्रदेशिक विभाग, ठाणे शहर यांनी वेळोवेळी मार्गदर्शन वर सुचना दिलेल्या आहेत.
वरील गुन्ह्यासंबंधी वरिष्ठांच्या दिलेल्या सुचनांप्रमाणे तसेच अमरसिंह जाधव, पोलीस उप आयुक्त परिमंडळ-5 , वागळे इस्टेट, ठाणे. मंदार जवळे, सहाय्यक पोलीस आयुक्त , वर्तकनगर विभाग, ठाणे तसेच राजकुमार वाघचवरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वर्तकनगर पोलीस ठाणे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक (गुन्हे) एम. के. कोकरे यांनी इतर पोलीस अधिकारी व अंमलदार यांचेसह आहोरात्र परिश्रम करून आरोपीत याचे वास्तव्यासंबंधीचे ठावठिकाण्यांचा वारंवार अभ्यास करून नमुद आरोपीत यास आर. के. ज्वेलर्स गल्ली हरीपुर कलान, भाडयाची खोली, रायवाला पोलीस स्टेशन, जिल्हा-देहरादुन, राज्य उत्तराखंड येथुन ताब्यात घेवुन वरील गुन्ह्यात अटक केलेली आहे.
आरोपी हा अशाच प्रकारे स्वतःची ओळख लपवुन इतर मुलींसोबत सोशल मिडीया साईडवरून ओळख करून त्यांचेशी मैत्री करून त्यांचा विश्वास संपादन करून त्यांचे आक्षेपार्ह व्हिडीओ बनवुन त्यानंतर नमुद मुलीने बोलण्यास टाळाटाळ केल्यानंतर तीचे आक्षेपार्ह व्हिडीओ तीचे नातेवाईक / मित्र मैत्रीणींचे मोबाईलवर पाठवित असल्याची बाब समोर आलेली आहे
गुन्हा हा अल्पवयीन मुलीशी संबंधीत व गंभीर स्वरूपाचा असल्याने सदर गुन्हयासंबधी आशुतोष हुंबरे साो. पोलीस आयुक्त, ठाणे शहर, डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण, पोलीस सह आयुक्त, ठाणे शहर, विनायक देशमुख अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रदेशिक विभाग, ठाणे शहर यांनी वेळोवेळी मार्गदर्शन वर सुचना दिलेल्या आहेत.
गुन्ह्यासंबंधी वरिष्ठ दिलेल्या सुचनांप्रमाणे तसेच अमरसिंह जाधव, पोलीस उप आयुक्त परिमंडळ-5, वागळे इस्टेट, ठाणे, मंदार जवळे, सहाय्यक पोलीस आयुक्त, वर्तकनगर विभाग, ठाणे तसेच राजकुमार बाघचवरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वर्तकनगर पोलीस ठाणे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक (गुन्हे) एम. के. कोकरे यांनी इतर पोलीस अधिकारी व अंमलदार यांचेसह आहोरात्र परिश्रम करून आरोपीत याचे वास्तव्यासंबंधीचे ठावठिकाण्यांचा वारंवार अभ्यास करून नमुद आरोपीत यास आर. के. ज्वेलर्स गल्ली नं. 03 हरीपुर कलान, भाडयाची खोली, रायवाला पोलीस स्टेशन, जिल्हा-देहरादुन, राज्य उत्तराखंड येथुन ताब्यात घेवुन वरील गुन्ह्यात अटक केलेली आहे.आरोपी हा अशाच प्रकारे स्वतःची ओळख लपवुन इतर मुलींसोबत सोशल मिडीया साईडवरून ओळख करून त्यांचेशी मैत्री करून त्यांचा विश्वास संपादन करून त्यांचे आक्षेपार्ह व्हिडीओ बनवुन त्यानंतर नमुद मुलीने बोलण्यास टाळाटाळ केल्यानंतर तीचे आक्षेपार्ह व्हिडीओ तीचे नातेवाईक मित्र मैत्रीणींचे मोबाईलवर पाठवित असल्याची बाब समोर आलेली आहे.
गुन्हयासंबंधी सखोल तपास वरिष्ठांचे मार्गदर्शनानुसार एम. के. कोकरे, पोलीस निरीक्षक (गुन्हे), नेमणुक वर्तकनगर पोलीस ठाणे हे करीत आहेत.