Chhagan Bhujbal : लोकसभेच्या निवडणुकीमधून पूर्णपणे माघार घेत असल्याचे मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून जाहीर
•छगन भुजबळ यांनी महाविकास आघाडीचा प्रचार पुढे गेला असल्याचे सांगितले, तसेच माझ्या ऐवजी मुलगा समीर भुजबळ यांना उमेदवारी जाहीर करावी अशी केली होती मागणी
नाशिक :- लोकसभा मतदार संघातून मी माघार घेत असल्याचे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मंत्री छगन भुजबळ यांनी जाहीर केले. उमेदवार जाहीर होण्यास खुपच उशीर होत आहे. त्यामुळे संभ्रम निर्माण होऊन, महायुतीचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे आपण पूर्णपणे माघार घेत असल्याचे भुजबळ यांनी म्हटले आहे. माझ्यावर विश्वास ठेवून माझे नाव, नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी सुचवले त्या बद्दल मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे आभार मनापासून आभार मानत असल्याचे छगन भुजबळ यांनी म्हटले आहे.
उमेदवार जाहीर होण्यास उशीर होत आहे. त्याचे नुकसान देखील महायुतीला होऊ शकते. त्यामुळे ताबडतोब निर्णय जाहीर होणे आवश्यक आहे. कोणत्याही पक्षाला उमेदवारी द्या, मात्र, लवकर उमेदवारी जाहीर करा, असा सल्ला देखील छगन भुजबळ यांनी महायुतीला दिला आहे. हा संभ्रम लवकर दूर व्हायला पाहिजे, त्यामुळेच मी आज उमेदवार बाबतीत माघार घेतली असल्याचे छगन भुजबळ यांनी जाहीर केले
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना समीर भुजबळ साठी उमेदवारी जाहीर करावी अशी मागणी केली होती ; मंत्री छगन भुजबळ, अमित शहा यांच्या बैठकीमध्ये माझ्या नावाचा निर्णय झाला होता. मात्र, पुढच्या काळामध्ये जागावाटप जाहीर करण्यासाठी आणि उमेदवार ठरवण्यासाठी थोडा वेळ जात होता. त्यामुळे त्याची चर्चा जास्त रंगली. असे असताना आम्हाला माध्यमांना दिल्लीत काय ठरले, हे सांगताही येत नव्हते. त्यामुळे मी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन करून आपण समीर भुजबळ यांना उमेदवारी जाहीर करावी, अशी विनंती केली. मात्र, नाशिकमधून तुम्हीच उभे राहणार असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले असल्याचे माहिती देखील छगन भुजबळ यांनी दिली. जर महायुतीमध्ये सर्व ठरले असेल तर ती जागा जाहीर करायला हवी, असे देखील छगन भुजबळ यांनी म्हटले आहे. मात्र, नंतरच्या काळात जागावाटपाबाबत चर्चा सुरू असल्याचे समजले. आता तीन आठवडे संपले असले तरी देखील जागा वाटपाची माहिती जाहीर झालेली नाही. तर दुसरीकडे महाविकास आघाडीचे उमेदवार जाहीर देखील झाले आणि त्यांचा प्रचार देखील सुरू झाला असल्याचे छगन भुजबळ यांनी म्हटले आहे.