Vasai Crime News : नायजेरियन व्यक्तीकडे मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थाचा साठा, तुळींज पोलिसांची कारवाई, नायजेरियन व्यक्तीकडून 50 लाखाहून अधिक किमतीचे अमली पदार्थ जप्त
तुळींज पोलीसांची मोठी कारवाई ;अंमली पदार्थ बाळगणाऱ्या नायजेरियन व्यक्तीला ताब्यात घेवुन त्याचेकडुन एकुण 57 लाख 50 हजार एकूण किमतीचा अंमली पदार्थ (कोकेन, एम.डी,) जप्त
वसई :- वसई-विरार, नालासोपारा परिसरात मोठ्या प्रमाणे नायजेरियन लोकवस्ती असून येथे मोठ्या संख्येने नायजेरियन लोक राहत आहे. परंतु गेले कित्येक दिवसांपासून त्या नायजेरियन व्यक्तीकडून मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थाचे तस्करी होतानाच्या घटना सातत्याने समोर येत आहे. पोलिसांना (11 एप्रिल ) रोजी तुळींज पोलीस ठाणे नेमणुकीतील पोलीस अंमलदार सगळे यांना त्यांचे गुप्त माहितीदाराकरवी माहिती मिळली कि, रूम नं. 204 जगन्नाथ अपार्टमेंट हायटेंशन रोड प्रगतीनगर या रूममध्ये एक नायजेरियन व्यक्ती मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थाचा साठा केला असून, तो राहते रूममधुन चिल्लर स्वरूपात अंमली पदार्थाची विक्री करीत आहे. सदरबाबत त्यांनी लागलीच वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेंद्र नगरकर यांना माहीती दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षकनगरकर यांनी लागलीच सदरबाबत सहायक पोलीस आयुक्त, तुळींज विभाग यांना मिळालेल्या बातमीच्या अनुषंगाने कारवाई करणेबाबत आदेश प्राप्त करुन घेवुन तसेच सोबत पोलीस अधिकारी व अंमलदार यांचेसह मिळालेल्या बातमीच्या अनुषंगाने जावून, प्रवेश करून, रूममध्ये मिळून आलेला नायजेरियन इसम नाव EZE FRANCIS ANA AGE- 44 YEAR हायटेंशन रोड प्रगतीनगर नालासोपारा पूर्व ता. वसई जि. पालघर मूळ रा. स्टेट इनुगु नायजेरिया याची अंगझडती तसेच घरझडती घेतली असता खालील वर्णनाचा अंमली पदार्थ मिळून आला आहे. Vasai Crime News
1) 13 लाख 30 रूपये किमतीची सफेद रंगाचे 04 गोळे असलेला कोकेन नावाचा अंमली पदाथाचे एकत्रित नेट वजन 133 ग्रॅम प्रति ग्रॅम 10 हजार रुपये ग्रॅम आरोपीत याचे अंगझडतीत मिळून आलेले.)
2) 16 लाख 90 हजार रूपये किमतीची पारदर्शक प्लॅस्टिक पिशवी मधील तपकिरी रंगाचे पावडर एम.डी. नावाचा अमली पदार्थ त्याचे पिशवी सह वजन 169 ग्रॅम (किमंत 10 हजार रूपये प्रती ग्रॅम) आरोपीत याचे घराढीतमध्ये मिळुन आलेली.
3) 27 लाख 30 हजार रूपये किमतीची पारदर्शक प्लॅस्टिक पिशवी मधील फिक्क्ट सफेद रंगाचे पावडर एम.डी. नावाचा अमली पदार्थ त्याचे पिशवी सह वजन 273 ग्रॅम (किमंत 10 हजार रूपये प्रती ग्रॅम) आरोपी याचे घरझडतीमध्ये मिळून आलेली.
व्यक्तीची अंगड़ाडतीमध्ये व घरडझडतीमध्ये 133 ग्रॅम वजनाचा कोकेन अंमली पदार्थ तसेच 442 ग्रॅम वजनाचा तपकिरी व सफेद फिक्कट रंगाची पावडर एम.डी. मेफेड्रॉन नावाचा अंमली पदार्थ असा एकुण 57 लाख 50 हजार रूपये किंमतीचा एकुण 575 ग्रॅम वजनाचा बेकायदेशीर कोकेन व एम.डी. मेफेड्रॉन नावाचा अंमली पदार्थ जप्त केला असून, सदर व्यक्तीविरोधात तुळींज पोलीस ठाणे एन.डी.पी.एस. कायदा 1985 चे कलम 8 क, 21 क, प्रमाणे दिनांक 11 एप्रिल रोजी गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीत यास सदर गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक वाय. एस. खैरे करित आहेत. Vasai Crime News
पोलीस पथक
पौर्णिमा चौगुले-श्रींगी पोलीस उप आयुक्त, परीमंडळ-2 वसई, उमेश माने- पाटील सहाय्यक पोलीस आयुक्त, तुळींज विभाग, तुळींज पोलीस ठाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेंद्र नगरकर, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुधिर चव्हाण, गुन्हे प्रकटिकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनिल पवार, पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब बांदल, पोलीस हवालदार मोरे, वरठा, गायकवाड, पन्हाळकर, केंद्रे, राठोड, पोलीस शिपाई साळुंखे, पोटे, कदम, सगळे, राजगे, महिला पोलीस हवालदार जाधव यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे. Vasai Crime News