
Virar Cyber Crime News : ऑनलाइन फसवणूक झालेली रक्कम 1 लाख 25 हजार परत करण्यात सायबर पोलीस ठाणेस यश
विरार :- बनावट लिंक पाठवण्यात आली त्या लिंक मध्ये क्रेडिट कार्ड संदर्भातील संपूर्ण माहिती भरून फसवणूक झाली होती. Online Cyber Fraud ऑनलाईन फसवणुक होण्याच्या घटना सातत्याने वाढत त्या अनुषंगाने पोलिसांकडून कठोर पावले उचलले जात आहे. सायबर गुन्हेगारीला आळा घालण्याकरिता पोलिसांकडून वारंवार जनजागृती केली जात आहे.ऑनलाइन फसवणूक झाल्याचे पैसे परत मिळवून देण्यास पोलिसांना यश आले आहे.मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयातील कार्यक्षेत्रातील वालीव परिसरातील तक्रारदार विश्वकर्मा यांना त्यांच्या मोबाईलच्या व्हाट्सअप वर एक लिंक आली होती. या लिंक वर क्रेडिट कार्ड संदर्भातील माहिती भरण्यास सांगितले त्यांच्या क्रेडिट कार्ड खात्यातून 1 लाख 25 हजार रुपये कट झाले चा मेसेज आला आहे. या फसवणुकीबाबत त्यांनी सायबर विभागाला सायबर पोलीस ठाणे Cyber Police Station तक्रार दाखल केली.
सायबर विभागाची दमदार कामगिरी
त्यांच्या तक्रारीबाबत तात्काळ दखल घेवून तक्रारदार यांचे झाले व्यवहाराबाबत माहिती प्राप्त करण्यात आली. फसवणूक रक्कम Online Shopping E-commerce खात्यावर जमा झाल्याचे दिसून आले. सायबर पोलीस ठाणेकडून तात्काळ पत्रव्यवहार करून व सातत्यपूर्ण पाठपुरावा करून नमूद फसवणूक रक्कम थांबविण्यात आली, फसवणूकीच्या रकमेची पूर्ण रक्कम म्हणजेच 1 लाख 25 हजार रुपये पुन्हा तक्रारदार यांचे मुळ खात्यावर परत मिळविण्यात आली.

पोलीस पथक
अविनाश अंबुरे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे), मदन बल्लाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे), मि. भा. व. वि. पोलीस आयुक्तालय यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श सुजितकुमार गुंजकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील वाव्हळ, पोलीस उपनिरीक्षक प्रसाद शेनोळकर, सहाय्यक फौजदार मिलाग्रिस फर्नांडिस, पोलीस अंमलदार सावन शेवाळे, महिला पोलीस हवालदार माधुरी धिंडे,सोमनाथ बोरकर यांनी पार पाडली आहे.