Anti Corruption Bureau News : लाचलुचपत प्रतिबंधक विभाग जालना यांची मोठी कारवाई ; जालना महानगरपालिकेच्या लिपिकाला लाच घेताना रंगेहाथ पकडले
Anti Corruption Bureau Jalna News : जालना महानगरपालिकेचा लाचखोर लिपिकाने तीस हजाराची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केले अटक
जालना :- जालना महानगरपालिकेच्या Jalna BMC मालमत्ता विभागातील लिपिकाने तक्रारदार यांच्या थकित मालमत्ता दर कमी करण्याकरिता तक्रारदारांच्याकडून तीस हजारांची मागितली होती लाच. लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग जालना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. Anti Corruption Bureau Jalna News
तक्रारदार यांना महानगर पालिका Jalna BMC यांचे कडून 1 एप्रिल 2018 ते 31 मार्च 2024 चे मालमत्ता कर भरणा कामी 1 लाख 24 हजार 596 रू. नोटीस मिळाली होती. त्यामुळे तक्रारदार यांनी महानगरपालिका जालनाचे उत्तम लाडाने (40 वर्ष) यांचेकडे 05 एप्रिल 2024 रोजी 41 हजार 532 रू. चेक दिला होता. तेव्हा लाडाणे हे तक्रारादार यांना म्हणाला की तुमच्याकडे कडे बाकी राहिलेले 83 हजार रू.मालमत्ता कर तुम्ही भरू नका, त्याऐवजी मला 40, हजार रू. द्या, 2024 पर्यंत सर्व कर नील करून देतो असे म्हणून लगेच 10, हजार रू. तक्रारदार यांचे कडून स्वीकारले आहे. Anti Corruption Bureau Jalna News
10 एप्रिल रोजी लाच मागणी पडताळणी कारवाई दरम्यान आलोसे लाडाणे याने पंचासमक्ष तक्रारदार यांचा मालमत्ता कर निल दाखवण्यासाठी 30 हजार रूपये लाचेची मागणी करुन सापळा कारवाई दरम्यान आज आलोसे लाडाणे यांनी तक्रारदार यांचे कडून ग्लोबस मेडिकल स्टोअर येथे शासकीय पंचासमक्ष 30 हजार रु. लाचेची रक्कम स्विकारतांना रंगेहाथ पकडले आहे. आलोसे उत्तम लाडाणे यास ताब्यात घेतले असुन त्यांचेवर पोलीस ठाणे कदिम जालना, जि. जालना येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालु आहे. Anti Corruption Bureau Jalna News
मार्गदर्शक सापळा अधिकारी व तपास अधिकारी
किरण बिडवे
पोलीस उपअधीक्षक, ए.सी.बी. जालना ,संदीप आटोळे, पोलीस अधीक्षक,ए.सी.बी. छत्रपती संभाजीनगर मुकुंद आघाव, अप्पर पोलीस अधीक्षक,ए.सी.बी. छत्रपती संभाजीनगर, सापळा पथक -पोलीस अंमलदार गजानन घायवट, गणेश चेके, गणेश बुजाडे ए.सी.बी. जालना युनिट.