क्राईम न्यूजमुंबई

Nala Sopara Crime News : Credit Card द्वारे ऑनलाईन फसवणूक

Nala Sopara Online Scam Crime News : ऑनलाइन फसवणूक झालेली रक्कम 40 हजार रुपये परत करण्यात सायबर पोलीस ठाणेस यश

नालासोपारा :– क्रेडिट कार्ड च्या Credit Card नावाने ऑनलाईन फसवणूक Online Fraud होण्याच्या घटना सातत्याने वाढत त्या अनुषंगाने पोलिसांकडून कठोर पावले उचलले जात आहे. सायबर गुन्हेगारीला Cyber Crime आळा घालण्याकरिता पोलिसांकडून वारंवार जनजागृती केली जात आहे.ऑनलाइन फसवणूक झाल्याचे पैसे परत मिळवून देण्यास पोलिसांना यश आले आहे.मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयातील कार्यक्षेत्रातील नालासोपारा पोलीस ठाणेचे हद्दीतील तक्रारदार रावत यांनी पंजाब नॅशनल बँकेचे क्रेडीट कार्डकरीता अप्लाय केले होते. तक्रारदार यांना क्रेडिट कार्ड प्राप्त झाल्यानंतर पंजाच नॅशनल बँकेतून बोलत असल्याचे सांगुनफोन केला. अनोळखी मोबाईल धारकाने तक्रारदार यांचेकडून क्रेडिट कार्डाची माहिती घेवून 44 हजार 772 रु ची फसवणूक केली. सायबर पोलीस ठाणे 7 फेब्रुवारी 2024 अन्वये अर्ज प्राप्त होता. Nala Sopara Crime News

नमूद तक्रारीचाबत तात्काळ दखल घेवून तक्रारदार यांचे झाले व्यवहाराबाबत माहिती प्राप्त करण्यात आली. सदरची फसवणूक रक्कम Payu Payments च्या मर्चेंट च्या अकाऊंटवर गेल्याचे दिसून आले. सायबर पोलीस ठाणेकडून तात्काळ पत्रव्यवहार करून व सातत्यपूर्ण पाठपुरावा करून नमूद फसवणूक रक्कम थांबविण्यात आली, सायबर पोलीस ठाणेकडून तात्काळ केलेल्या पत्रव्यवहार व पाठपुराव्यामुळे सदरची फसवणूक रक्कमेपैकी 40 हजार रुपये पुन्हा तक्रारदार यांचे मुळ खात्यावर परत मिळविण्यात आली. Nala Sopara Crime News

पोलीस पथक

अविनाश अंबुरे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे), मदन बल्लाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे), मिरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालय यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुजितकुमार गुंजकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील पाव्हळ, पोलीस उपनिरीक्षक प्रसाद शेनोळकर, महिला पोलीस अंमलदार अमिना पठाण, सुपर्णा माळी, महिला पोलीस हवालदार माथुरी धिंडे, पोलीस अंमलदार राहुल बन, कुणाल सावळे, राजेश भरकडे,आकाश बोरसे यांनी पार पाडली आहे. Nala Sopara Crime News

नागरीकांना आवाहन

मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयातील नागरीकांना आवाहन करण्यात येते की, अशा प्रकारे फसवणूक करणे कायदयाने गुन्हा आहे. असा प्रकार आपल्यासोचत घडला असल्यास तात्काळ नजीकच्या पोलीस ठाणेस, सायबर गुन्हे कक्षास संपर्क साधावा. तसेच www.cybercrime.gov.in अथवा 1930 या हेल्पलाईनवर संपर्क साधून तक्रार द्यावी.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0