Indian Navy Anti-Piracy Operation : भारतीय नौदलाचे ॲन्टी पायरेसी ऑपरेशन दरम्यान ताब्यात घेतलेले 09 सोमालियन चाच्यांना अटक
इरानियन फ्लॅग असलेले शिप नामे ए आय कम्बर या मासेमारी करणारे जहाजास हायजॅक केले आहे. आय.एन.एस. त्रिशुल व नेव्हल शिप सुभेदा यांना खात्री झाली की मासेमारी करणारे जहाज हे पायरेट यांनी हायजॅक केले
मुंबई :- (3 एप्रिल) भारतीय नौदलाचे आय. एन. एस. त्रिशुल या युध्दनौकेचे रेग्युलेटिंग ऑफिसर लेफ्टनंट अकितकुमार अवाल यांनी लेखी तक्रार देवुन कळविले की, भारतीय नौदलाकडून समुद्रातून चालणारे व्यापारी जहाज व क्रू मेंबर्स यांची सुरक्षितते कागी नियमित गस्त करण्यात येत असते. 28 मार्च रोजी 10.59 वाजता आय.एन.एस. त्रिशुल व नेव्हल शिप सुभेदा यांना हाय अलर्ट मिळाला कि, इरानियन फ्लॅग असलेले शिप नामे ए आय कम्बर या मासेमारी करणारे जहाजास हायजॅक केले आहे. आय.एन.एस. त्रिशुल व नेव्हल शिप सुभेदा यांना खात्री झाली की मासेमारी करणारे जहाज हे पायरेट यांनी हायजॅक केले आहे.
आय.एन.एस. त्रिशुल व नेहल शिप सुभेदा या इंडियन युध्द नौका यांनी 29 मार्च 2024 रोजी 3.10 वाजता खात्री केली की, ठिकाण हे 105 नॉटिकल मैल सोमालियाचे कोस्ट हददीत आहे. इंडियन युध्द नौकेवरील अधिकारी यांनी त्यांना वारंवार अनाउन्समेंट करून सांगितले की, तुम्ही जहाज थांबवा आणि ओलिस ठेवलेल्या व्यक्तींना मुक्त करा अन्यथा आम्हाला तुमच्या विरुध्द कारवाई करावी लागेल परंतु पायरेट काहीही ऐकुण न घेता जहाज थांबवत नव्हते किंवा सरेंडर करीत नव्हते. म्हणुन आय एन एस सुमेधा हि युध्द नौका जवळ जावुन 16 नंम्बर चॅनल मेरिटाईम मोबाईल ब्रॉडकास्ट मार्फत त्यांना वॉरनिंग करीत होती परंतु पायरेट त्याकडे दुलक्ष करीत होते.
त्यानंतर वारंवार दिलेल्या वॉरनिंग नंतर सोमालियन पायरेट यांनी ओलीस ठेवलेल्या कु मेंम्बरना ढाल बनवुन मासेमारीच्या डेकवर येवुन सरेंडर करीत आहे असा संदेश दिला त्यानंतर त्यांनी त्यांच्याकडे असलेले अवैध्य अग्नीशस्त्रे बंदूक पाण्यात टाकुन नाश केली त्यानंतर इंडियन युध्द नौकेवरील कमांडो हे ओलीस ठेवलेल्या मासेमारी जहाजावर उतरले आणि खात्री केली असता त्यामध्ये एकुण 9 सोमालियन चाच्या पायरेट होते तसेच ओलीस ठेवलेल्या मासेमारी जहाजावरीलशएकुण 23 कु मेम्बर हे पाकिस्तानी नागरिक होते. इंडियन युध्द नौकेवरील कमांडो यांनी कु र्मेम्बरकडे चौकशी केली असता त्यांनी सांगितले की, सोमालियन चाच्या पायरेट यांच्याकडे एके 47 रायफल हॅन्डग्रेनेड व रॉकेट लॉन्चर होते आणि ते जबरदस्तीने त्यांच्या मासेमारी जहाजावर चढले आणि त्यांनी शस्त्राचा धाक दाखवुन जर काही हलचाल केल्यास मारून टाकु अशी धमकी देत होते. त्यावेळी इंडियन कमांडो यांनी मासेमारी जहाजाची पाहणी केली असता त्या जहाजावर एकुण 428 जिवंत काडतुसे एके 47 रायफलवी तसेच एक जीपीएस डिव्हाईस, 08 मोबाईल फोन इत्यादी साहित्य जप्त करून ताब्यात घेतले.
सोमालियन चाव्यांनी ताब्यात घेतलेली इरानियन देशाचा फ्लॅग असलेली मासेमारी बोट व त्यावरील 23 कु मेम्बर यांचेकडे चौकशी करून त्यांना सोडुन दिले आणि एकुण 9 सोमालियन चाच्या पायरेट यांना कायदेशिर कारवाई करण्यासाठी 3 एप्रिल रोजी सकाळी 12.30 वाजता यलोगेट पोलीसांच्या ताब्यात दिले आणि तशी वरील प्रमाणे लेखी तक्रार दिल्याने यलोगेट पोलीस ठाणेत कलम 364(अ), 363,353,341,342,344,(अ) 120 (ब), 143,145,147,148,149,506(2), 34 भादवि सह मेरिटाईम अन्टी पायरसी ॲक्ट 2022 कलम 3,5 सह भारतीय हत्यार कायदा कलम 3,25,27,सह पासपोर्ट अधिनियम कलम 3,6 सह परकीय नागरी कायदा कलम 14 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
भारतीय नौदलाचे युध्द नौका आय.एन.एस. त्रिशुल आणि सुमेधा यांनी ॲटी पायरेसी ऑपरेशन दरम्यान ताब्यात घेतलेले एकुण 09 सोमालियन समुद्री चाचे यांना सदर गुन्हयात अटक करण्यात आली आहे. अटक आरोपीना उदईक 4 एप्रिल रोजी न्यायालया समक्ष हजर करीत आहोत. तसेच सदर सोमालियन चाचे यांनी गुन्हयात वापरलेले 09 मोबाईल फोन, 728 जिवंत काडतुसे एके 47 रायफलची, इत्यादी साहित्य जप्त करण्यात आले आहेत.