छत्रपती संभाजीनगर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई ; बोनाफाईड सर्टिफिकेट काढण्यासाठी मुख्याध्यापक आणि शिक्षक यांनी मागितली लाच स्वीकारताना रंगेहात पकडले
Anti Corruption Bureau Dharashiv Arrested Zakir Hussain Urdu School And Teacher For Bribe : शालेय मुख्याध्यापकाला आणि सहशिक्षकाला सहा हजाराची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले
धाराशिव :- डॉक्टर झाकीर हुसेन उर्दू हायस्कूल, उमरगा Dharashiv Arrested Zakir Hussain Urdu School तालुक्यातील मुरुम शाळेमध्ये मुख्याध्यापकाचे आणि सहशिक्षकांच्या कृत्य समाजाला लाजवल असे केले आहे. तक्रारदार याच्या बहिणीचे बोनाफाईड सर्टिफिकेट काढण्याकरिता आरोपी सईद अहमद मोहम्मद मकबुल अहमद, मुख्याध्यापक (57 वर्षे), यांनी तक्रारदार यांच्याकडे 28 मार्च रोजी पंचांसमक्ष सहा हजार रुपये लाचेची मागणी करून तडजोडीअंती 5 हजार 800 रुपये लाच रक्कम स्विकारण्याचे मान्य केले व काल(2 एप्रिल) रोजी आरोपी क्रमांक 01 यांचे सांगणेवरुन आरोपी क्रमांक 02 शहाजहान अब्दुल खय्युम पटेल, सहशिक्षक (54 वर्षे) याने पंचांसमक्ष 5 हजार 800 रुपये लाच रक्कम स्वीकारली असता दोन्ही आरोपी यांना ताब्यात घेण्यात आले असुन पोलीस स्टेशन मुरुम, ज़िल्हा धाराशिव येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालु आहे. Anti Corruption Bureau Dharashiv
सापळा मागदर्शक अधिकारी
संदीप आटोळे, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. छत्रपती संभाजी नगर,सिध्दाराम म्हेत्रे, पोलीस उप- अधीक्षक, ला.प्र.वि. धाराशिव ,मुकुंद आघाव अप्पर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. छत्रपती संभाजी नगर
नानासाहेब कदम, पोलिस निरीक्षक, ला. प्र. वि. धाराशिव पोलीस अमलदार सिध्देश्वर तावसकर, आशीष पाटील, अविनाश आचार्य. यांनी सापळा रचून लाचखोर मुख्याध्यापक शिक्षकाला अटक केली आहे.