क्राईम न्यूजठाणेमुंबई
Trending

Dindoshi Police News : दिंडोशी पोलिसांची धडाकेबाज कारवाई! अट्टल दुचाकी चोरटा गजाआड; 3 गुन्हे उघडकीस तर 3 गाड्या हस्तगत

Dindoshi Police Latest News : सीसीटीव्ही आणि तांत्रिक तपासाच्या जोरावर सादिक शेखला ठोकल्या बेड्या; दिंडोशी आणि कुरार पोलीस ठाण्यातील गुन्हे उघड

मुंबई | मुंबईतील दिंडोशी पोलीस ठाण्याच्या Dindoshi Police हद्दीत दुचाकी चोरीच्या घटना वाढत असताना, गुन्हे प्रकटीकरण पथकाने कौशल्याने तपास करत एका सराईत चोरट्याला अटक केली आहे. सादिक खुर्शीद शेख (वय 26) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, त्याच्याकडून 1 लाख 10 हजार रुपये किमतीच्या एकूण 3 मोटार सायकली हस्तगत करण्यात आल्या आहेत. Mumbai Latest Bike robbery News

नेमकी घटना काय?

गोरेगाव पूर्व येथील फिल्मसिटी रोड परिसरात राहणारे सुनील शिवाजी जाधव यांची ‘होंडा ॲक्टिव्हा ५जी’ (MH-47 AM-0589) अज्ञात इसमाने चोरी केली होती. याप्रकरणी जाधव यांनी दिंडोशी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर भा.न्या. संहिता कलम 303 (2) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला होता.दुचाकी चोरीचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. गुप्त बातमीदार आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी संशयित आरोपी सादिक शेख याला 5 फेब्रुवारी 2026 रोजी ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्हा कबूल केला.

तीन गुन्हे उघडकीस

आरोपी सादिक शेखच्या चौकशीतून त्याने केवळ जाधव यांचीच नव्हे, तर अन्य दोन गाड्याही चोरल्याचे निष्पन्न झाले आहे. त्याच्याकडून हस्तगत केलेल्या गाड्यांमुळे खालील गुन्हे उघडकीस आले आहेत.

दिंडोशी पोलीस ठाणे,दिंडोशी पोलीस ठाणे,कुरार पोलीस ठाणे.

या पथकाने केली कामगिरी

ही यशस्वी कामगिरी उत्तर प्रादेशिक विभागाचे अप्पर पोलीस आयुक्त शशीकुमार मीना, पोलीस उप आयुक्त महेश चिमटे (परिमंडळ 12) आणि सहा. पोलीस आयुक्त विजय भिसे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. दिंडोशी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र शिंदे, पोलीस निरीक्षक शरद सुर्वे, गुन्हे प्रकटीकरण अधिकारी अजित देसाई व त्यांच्या पथकातील एएसआय मोरे, हवालदार हेमंत रोडे, शंकर माईंगडे, भोगले, पोलीस शिपाई काटे, झिंबल आणि तांत्रिक मदतीसाठी सागर पवार यांनी ही धाडसी कारवाई पूर्ण केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0