मुंबईठाणे
Trending

Satyajit Bade : रायगडचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बडे यांची ‘दिव्यांग कल्याण आयुक्त’ पदी नियुक्ती

Satyajit Bade : आय.ए.एस. (IAS) पदी पदोन्नतीनंतर पुणे येथे नवीन नियुक्ती; प्रशासकीय सेवेतील प्रदीर्घ अनुभवाचा लाभ मिळणार

रायगड/पुणे | रायगड जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बडे यांची राज्य शासनाने दिव्यांग कल्याण आयुक्त (महाराष्ट्र राज्य, पुणे) या अत्यंत महत्त्वाच्या पदावर नियुक्ती केली आहे. सामान्य प्रशासन विभागाने याबाबतचे अधिकृत आदेश जारी केले असून, विद्यमान आयुक्त कौस्तुभ दिवेगावकर यांच्याकडून तात्काळ पदभार स्वीकारण्याचे निर्देश त्यांना देण्यात आले आहेत.

भारतीय प्रशासकीय सेवेत (IAS) झेप

सत्यजित बडे यांची नुकतीच भारतीय प्रशासकीय सेवेत (IAS) निवड झाली होती. या निवडीनंतर त्यांची बदली निश्चित मानली जात होती. महाराष्ट्र विकास सेवेतील सन 2000 च्या बॅचचे अधिकारी असलेल्या बडे यांनी आपल्या 24 वर्षांच्या प्रशासकीय कारकिर्दीत विविध जिल्ह्यांत आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे.

अनुभवाचा असा आहे प्रवास…

कोल्हापूरचे सुपुत्र असलेल्या सत्यजित बडे यांचा प्रशासकीय प्रवास अत्यंत प्रेरणादायी आहे.

सुरवात: सन 2000 मध्ये राज्य लोकसेवा आयोगाद्वारे (MPSC) विकास शाखेत निवड.

गटविकास अधिकारी: आंबेगाव (पुणे) आणि वाळवा (सांगली) येथे उल्लेखनीय काम.

उपमुख्य कार्यकारी अधिकारी: पुणे (2013-17) आणि सातारा (2017-19) जिल्हा परिषद.
अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी: वर्धा (2019-22) आणि 2023 पासून आजतागायत रायगड जिल्हा परिषद.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0