मुंबई

Ahilyabai Holkar : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त देशभरात महिला सशक्तीकरणाचे नवे पर्व”

•प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत भोपाळमध्ये भव्य महिला सशक्तीकरण महासम्मेलन; विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन व अहिल्यादेवींच्या सन्मानार्थ विशेष टपाल तिकीट व नाणे जारी”

ANI :- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300 व्या जयंतीनिमित्त संपूर्ण देशभरात विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि विकासात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. माळवा प्रदेशाची ही न्यायप्रिय आणि लोककल्याणकारी शासिका आजही देशासाठी प्रेरणास्रोत ठरते आहे. त्यांच्या स्मृतींना उजाळा देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत भोपाळ येथे ‘महिला सशक्तीकरण महासंमेलन’ पार पडले.

या महासंमेलनात नरेंद्र मोदींनी इंदौर मेट्रो रेल्वे, सतना व दतिया येथील नवीन विमानतळ, क्षिप्रा नदीवरील घाटांचे भूमिपूजन आणि एकूण 1,271 ‘अटल ग्राम सेवा सदन’ प्रकल्पांचे उद्घाटन केले. याच कार्यक्रमात अहिल्यादेवींच्या स्मृतीप्रित्यर्थ एक विशेष टपाल तिकीट आणि 300 मूल्याचे नाणे जारी करण्यात आले. या जयंतीनिमित्त ‘राष्ट्रीय देवी अहिल्याबाई पुरस्कार’ही एका पारंपरिक महिला कलाकाराला प्रदान करण्यात आला.

अहिल्यादेवी होळकर यांचा जन्म 31 मे 1725 रोजी महाराष्ट्रातील चौंडी (जि. अहमदनगर) येथे झाला. विधवा झाल्यावरही त्यांनी माळवा प्रांताचा कारभार अत्यंत बुद्धिमत्तेने आणि न्यायाने चालवला. त्यांनी देशभरातील अनेक मंदिरांचे पुनर्निर्माण व जीर्णोद्धार करून धार्मिक आणि सांस्कृतिक वारसा जपला. त्यांच्या कार्यामुळे त्यांना ‘पुण्यश्लोक’ ही उपाधी लाभली.

या त्रिशताब्दी जयंतीचे औचित्य साधून संपूर्ण देशात महिला सशक्तीकरण, सामाजिक समतेची जाणीव आणि सांस्कृतिक वारशाची पुनःप्रस्थापना या मूल्यांना नवीन दिशा मिळाल्याचे दिसून येते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0