क्राईम न्यूजपुणे
Trending

Pune Crime News : पुण्यात सुशिक्षित सासरच्या विकृतीचा बळी! वंशाच्या दिव्यासाठी इंजिनिअर विवाहितेचा छळ; गर्भपातानंतर संपवली जीवनयात्रा

Pune Breaking News : सरपंच सासू अन् शिक्षक सासऱ्याने सव्वा पाच महिन्यांच्या बाळाचा जबरदस्तीने पाडला गर्भ; सोरतापवाडीत संतापजनक प्रकार

पुणे | पुण्यातील सुशिक्षित आणि प्रतिष्ठित म्हणवल्या जाणाऱ्या एका कुटुंबातील काळाकुट्ट चेहरा आज चव्हाट्यावर आला आहे. उरुळी कांचन जवळील सोरतापवाडी येथे सासरच्या मंडळींच्या छळाला कंटाळून दीप्ती मगर-चौधरी या उच्चशिक्षित इंजिनिअर विवाहितेने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. सरपंच सासू आणि शिक्षक सासऱ्याच्या वंशाच्या दिव्याच्या अट्टाहासाने एका सुविद्य तरुणीचा बळी घेतल्याने संपूर्ण पुण्यात संतापाची तीव्र लाट उसळली आहे. Pune Police News

धक्कादायक खुलासा

इच्छा नसताना गर्भलिंग तपासणी आणि गर्भपात दीप्ती हिच्या आईने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत सासरच्या मंडळींच्या विकृत मानसिकतेचा पाढाच वाचला आहे. दीप्तीला आधीच एक मुलगी होती. नोव्हेंबर 2025 मध्ये ती पाच महिन्यांची गरोदर असताना पती रोहनने तिला पुन्हा गर्भलिंग तपासणी करण्यासाठी जबरदस्ती केली. याला दीप्तीने कडाडून विरोध केला असता तिला बेदम मारहाण करण्यात आली. “आम्हाला वंशाचा दिवा हवा आहे, तू तपासणी करणार नसेल तर घरातून चालती हो,” अशी धमकी खुद्द सरपंच सासू सुनिता चौधरी आणि शिक्षक सासरे कारभारी चौधरी यांनी दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

पोटात मुलगी असल्याचे समजताच मांडला अघोरी खेळ

सासरच्या प्रचंड दबावामुळे अखेर दीप्तीला नतमस्तक व्हावे लागले आणि तिची गर्भलिंग तपासणी करण्यात आली. मात्र, पोटातील बाळ मुलगी असल्याचे समजताच सासरच्या मंडळींनी मानवतेला काळिमा फासणारे कृत्य केले. पती, सासू, सासरे आणि दीर या सर्वांनी संगनमत करून दीप्तीची इच्छा नसताना तिचा जबरदस्तीने गर्भपात घडवून आणला. या घटनेमुळे दीप्ती प्रचंड मानसिक धक्क्यात होती आणि त्यातूनच तिने शनिवारी रात्री राहत्या घरी टोकाचे पाऊल उचलले.

सरपंच सासू आणि शिक्षक सासऱ्यावर गुन्हा दाखल

ज्या समाजाला दिशा देण्याचे काम सरपंच आणि शिक्षकाचे असते, त्यांनीच एका उच्चशिक्षित सुनेचा छळ केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. उरुळी कांचन पोलिसांनी या प्रकरणी दीप्तीचा पती रोहन, सासू सुनिता, सासरे कारभारी आणि दीर रोहित या चौघांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त करणे, बेकायदेशीर गर्भपात आणि मारहाणीचे गंभीर गुन्हे दाखल केले आहेत. एका हुशार इंजिनिअर मुलीचा असा दुर्दैवी अंत झाल्याने “बेटी बचाओ, बेटी पढाओ” या घोषणा केवळ कागदावरच उरल्या आहेत का, असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0