मुंबई

Mumbai Varsha Bungalow : मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ बंगल्याबाहेर आत्मदहनाचा प्रयत्न; पोलिसांनी वेळीच रोखले

सोलापूरचा रहिवासी अजित मैन्दरगीने पेट्रोल ओतून आत्मदहनाचा केला प्रयत्न

मुंबई :- 28 मे रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शासकीय निवास ‘वर्षा’ बंगल्याबाहेर एक मोठी दुर्घटना थोडक्यात टळली. सोलापूर येथील रहिवासी अजित रामकृष्ण मैन्दरगी (39 वय) या व्यक्तीने दुपारी साडेतीन वाजता स्वतःवर पेट्रोल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. मात्र सतर्क पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत त्याला रोखले आणि एक मोठा अनर्थ टळला.

मलबार हिल पोलिसांच्या माहितीनुसार, अजित मैन्दरगी हा ‘वर्षा’ बंगल्याजवळ पोहोचून आत प्रवेश करण्याचा आग्रह धरत होता. पोलिसांनी रोखल्यावर त्याने अचानक खिशातून बाटली काढून स्वतःवर पेट्रोलसदृश पदार्थ ओतले. त्याच्या संशयास्पद वर्तनामुळे पोलिसांनी त्वरित कारवाई करत त्याला ताब्यात घेतले.

सरकारविरोधी गंभीर कलमांतर्गत गुन्हा दाखल; मानसिक तणाव की काही घडवून आणण्याचा कट?

या प्रकरणी पोलिसांनी भारतीय दंड संहिता (BNS) अंतर्गत कलम 121, 125 आणि 226 अशा गंभीर कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तसेच BNSS च्या कलम 35(3) नुसार नोटीस देत त्याची तात्पुरती मुक्तता करण्यात आली आहे.

अजितने आत्मदहनाचा प्रयत्न का केला यामागील कारण अद्याप अस्पष्ट आहे. पोलिसांकडून या घटनेचा सखोल तपास सुरू असून, त्यामागे कुठलीही पूर्वनियोजित योजना होती का, की तो मानसिक तणावाखाली होता, हे शोधले जात आहे. घटनेच्या संवेदनशीलतेच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा यंत्रणाही सतर्क झाल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0