मुंबई

Ambernath Election Update : अंबरनाथ निवडणुकीत ‘बोगस’ मतदानाचा राडा! कोहोजगावमध्ये 200 हून अधिक महिलांची संशयास्पद गर्दी; भाजप-काँग्रेस आक्रमक

भिवंडीहून आणले मतदार? पोलिसांकडून सभागृह रिकामे; अंबरनाथमधील राजकीय वातावरण पेटले

अंबरनाथ | राज्यातील 23 नगरपरिषदांसाठी आज मतदानाची प्रक्रिया पार पडत असतानाच, अंबरनाथमध्ये लोकशाहीला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. कोहोजगाव परिसरातील एका सभागृहात पहाटेच्या सुमारास शेकडो महिला आणि पुरुषांची गर्दी जमल्याचे उघड झाले असून, हे सर्वजण ‘बोगस मतदान’ करण्यासाठी आणलेले बाहेरचे लोक असल्याचा गंभीर आरोप भाजप आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केला आहे.

पहाटेचा ‘तो’ संशयास्पद मेळावा अन् गोंधळ!

मिळालेल्या माहितीनुसार, कोहोजगावमधील एका खाजगी सभागृहात पहाटेपासूनच लोकांची वर्दळ सुरू होती. ही बातमी वाऱ्यासारखी पसरताच भाजप आणि काँग्रेसचे स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते घटनास्थळी दाखल झाले. प्रतिस्पर्धी उमेदवाराने मतदान प्रक्रियेवर डल्ला मारण्यासाठी या महिलांना बाहेरून आणले असल्याचा आरोप करत कार्यकर्त्यांनी सभागृहाबाहेर जोरदार घोषणाबाजी केली. यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांचा मोठा ताफा तैनात करण्यात आला आहे.

208 महिला आणि मुले; सर्वजण भिवंडीचे?

या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करत सभागृहातील गर्दीला बाहेर काढले. प्राथमिक तपासाबाबत माहिती देताना अंबरनाथ पोलिसांनी सांगितले की, “सभागृहात एकूण 208 महिला आणि मुले आढळून आली आहेत. प्राथमिक चौकशीत हे सर्वजण भिवंडी परिसरातील रहिवासी असून ते स्थानिक मतदार नसल्याचे समोर आले आहे.” हे लोक तिथे नेमके कशासाठी जमले होते आणि त्यांना कोणी आणले, याची खात्री-पडताळणी फिरत्या पथकामार्फत (Flying Squad) केली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0