मुंबई

Mumbai Crime News : मुंबईत 31 कोटींच्या फसवणुकीने खळबळ! – बिल्डर पिता-पुत्रांनी जोगेश्वरीतील पुनर्विकास प्रकल्पात 18 गुंतवणूकदारांची दिशाभूल केली

•वार्षिक 18 % व्याजाचे मोठे आमिष; ‘रणबीर रिअल इस्टेट’चे संचालक जयकुमार आणि सुयश गुप्ता फरार; अंधेरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

मुंबई :- मुंबईतील रिअल इस्टेट क्षेत्रात मोठा घोटाळा उघडकीस आला आहे. जोगेश्वरी येथील पुनर्विकास प्रकल्पात गुंतवणुकीवर मोठा परतावा देण्याचे आमिष दाखवून एका बिल्डर पिता-पुत्रांनी तब्बल 31 कोटी 26 लाख रुपये जमा करून 18 गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी अंधेरी पोलीस ठाण्यात ‘मे. रणबीर रिअल इस्टेट डेव्हलपर्स एलएलपी’ आणि तिचे संचालक जयकुमार गुप्ता व सुयश गुप्ता यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

फिर्यादी महेश हकीमचंद दोशी यांच्या तक्रारीनुसार, मार्च 2021 ते मे 2023 या कालावधीत आरोपींनी गुंतवणूकदारांना त्यांच्या प्रकल्पात गुंतवणूक केल्यास वार्षिक 18% तिमाही व्याज देण्याचे खोटे आश्वासन दिले. या आमिषाला बळी पडून फिर्यादींसह 18 जणांनी कोट्यवधी रुपयांची रक्कम आरोपींकडे सुपूर्द केली. मात्र, ठरल्याप्रमाणे परतावा किंवा मुद्दल परत न करता आरोपींनी सर्वांची फसवणूक केली.

या प्रकरणी अंधेरी पोलीस ठाण्यात दिनांक 3 डिसेंबर रोजी भादंवि कलम 406 (विश्वासघात) आणि 420 (फसवणूक) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, आर्थिक गुन्हे शाखा (EOW) या प्रकरणाचा सखोल तपास करत आहे. आरोपी पिता-पुत्र फरार असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0