मुंबई

Malegaon Crime News : मालेगाव हादरले! 3 वर्षीय चिमुरडीवर अत्याचार करून दगडाने ठेचून निर्घृण हत्या

वडिलांशी झालेल्या भांडणाचा सूड निष्पाप मुलीवर; आरोपी विजय खैरनर अटकेत, खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवणार

मालेगाव :- नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावात तीन वर्षीय चिमुरडीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केल्याची माणुसकीला काळिमा फासणारी आणि हादरवून टाकणारी घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात तीव्र संताप आणि शोकाकुल वातावरण पसरले आहे.

सैतानी कृत्य आणि सूडाची भावना

16 नोव्हेंबर रोजी गावातील 24 वर्षीय विजय संजय खैरनर या नराधमाने चिमुरडीवर अत्याचार केला आणि नंतर तिचे डोके दगडाने ठेचून अमानुषपणे तिची हत्या केली. प्राथमिक तपासात, साधारण एक महिन्यापूर्वी आरोपी विजय खैरनरचे मुलीच्या वडिलांसोबत भांडण झाले होते. वडिलांशी झालेल्या या वादाचा राग आरोपीच्या मनात होता आणि त्या रागातूनच त्याने हे सैतानी कृत्य केल्याची माहिती समोर येत आहे.

आक्रोश आणि न्यायालयीन प्रक्रिया
मालेगाव तालुका पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपी विजय खैरनर याला ताब्यात घेतले आहे. न्यायालयाने आरोपीला 20 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पीडित मुलीचा मृतदेह तिच्या घरी आणला गेला तेव्हा संपूर्ण गावात एकच आक्रोश पसरला.

फास्टट्रॅक कोर्टात खटला चालवणार

या घटनेची गांभीर्याने दखल घेत, मंत्री दादा भुसे आणि पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी सदर केस फास्टट्रॅक कोर्टात चालवण्याचे आणि खटला लढवण्यासाठी सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची नेमणूक करण्याचे आश्वासन दिले आहे.

लासलगावात संतापाची लाट

या अमानुष कृत्याच्या निषेधार्थ लासलगाव येथील सुवर्णकार समाजाने मूक मोर्चा काढून संताप व्यक्त केला. शिवाजी चौकातून पोलीस ठाण्यापर्यंत मोर्चा काढत, महिलांनी आरोपीला तातडीने फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी केली आहे. ऑल इंडिया पॅंथर सेनेसह अनेक संघटनांनीही आरोपीला फाशी देण्याची मागणी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0