पुणे
Trending

Pune Bengaluru Highway Accident : पुणे-बेंगळूर महामार्गावर भीषण दुर्घटना! नवले पुलावर अपघातात 9 जणांचा मृत्यू

Pune Latest Accident News : ब्रेक फेल झालेल्या ट्रकने अनेक वाहनांना चिरडले; सीएनजी स्फोटामुळे आग, रोहित पवारांकडून उपाययोजनांची मागणी

पुणे :- पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील नवले पुलावर काल रात्री झालेल्या भीषण अपघातात 9 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, 15 हून अधिक जण जखमी झाले आहेत. Pune Highway Accident अपघातानंतर घटनास्थळी मोठा स्फोट होऊन आग लागल्याने अपघाताची दाहकता वाढली. या घटनेमुळे नवले पुलाचा ‘ब्लॅक स्पॉट’ हा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. Pune Latest Accident News

एका भरधाव ट्रकचा ब्रेक फेल झाल्यामुळे त्याने रस्त्यावर असलेल्या अनेक वाहनांना जोरदार धडक दिली आणि हा ट्रक वाहनांना घेऊन एका कंटेनरवर आदळला. या धडकेमुळे एका कारमधील सीएनजीचा भीषण स्फोट झाला आणि तातडीने आग लागल्याने दुर्घटना अधिक भीषण झाली. पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत स्थानिकांच्या मदतीने बचावकार्य केले आणि जखमींना रुग्णालयात दाखल केले.

या दुर्घटनेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही घटना अत्यंत दुर्दैवी आणि वेदनादायी असल्याचे सांगत मृतांना श्रद्धांजली वाहिली. दुसरीकडे, आमदार रोहित पवार यांनी नवले पुलावरील अपघातांच्या वाढत्या घटनांवरून प्रशासनावर टीका केली आहे. “पुण्यातला नवले पूल हे ठिकाण ब्लॅक स्पॉट बनलं असून इथं वारंवार अपघात होऊनही प्रशासनाकडून आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात नाहीत. शासनाने या विषयाकडे गांभीर्याने लक्ष देऊन योग्य त्या उपाययोजना कराव्यात,” अशी मागणी त्यांनी केली आहे.

या दुर्घटनेमुळे पुणे महामार्ग प्रशासनाच्या उपाययोजनांवर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0