Thane Robbery News : दरवाजा उघडा दिसताच डाव साधायचा! ‘अंबुर’ कनेक्शन असलेला आंतरराज्यीय चोर ठाण्यात जेरबंद

Thane Latest Robbery Case : सीसीटीव्ही आणि तांत्रिक माहितीच्या आधारे ठाणे गुन्हे शाखेची धडक कारवाई; ४ गुन्हे उघड, २ लाख १४ हजार रुपयांचा ऐवज हस्तगत
ठाणे :- घराचा दरवाजा उघडा दिसताच आत प्रवेश करून मोबाईल आणि लॅपटॉप चोरणाऱ्या एका अट्टल आंतरराज्यीय आरोपीला ठाणे गुन्हे शाखा युनिट-1 Thane Crime Branch Unit 1 ने मुंब्रा परिसरातून अटक केली आहे. या आरोपीच्या अटकेमुळे ठाणे आणि नवी मुंबई परिसरातील एकूण ४ घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. Thane Latest Crime News
आरोपी सत्यनाथन व्यकंटेशन (वय 37, मूळ रा. अंबुर, तामिळनाडू, सध्या रा. शिळगाव, ठाणे) हा शिळडायघर आणि मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत सक्रिय होता. त्याचा मुख्य उद्देश उघड्या दरवाजावाटे घरात प्रवेश करून मौल्यवान वस्तू चोरणे हा असायचा. या आरोपीने ऑक्टोबर 2025 पासून शिळडायघर पोलीस ठाणे हद्दीत आणि नोव्हेंबर 2025 मध्ये मानपाडा पोलीस ठाणे हद्दीत डोंबिवली पूर्व येथे चोरीच्या घटना घडवल्या होत्या. Thane Police Latest Crime News
गुन्हे शाखा, घटक-1, ठाणे येथील पथकाने तांत्रिक माहिती आणि आरोपीच्या ये-जा करण्याच्या मार्गावरील सीसीटीव्ही फुटेजचा कसून तपास केला. या आधारावर आरोपी सत्यनाथन व्यकंटेशन याला 11 नोव्हेंबर 2025 रोजी मुंब्रा परिसरातून ताब्यात घेण्यात आले. त्याने चौकशीदरम्यान शिळडायघर, मानपाडा, बाळे (नवी मुंबई) आणि खारघर (नवी मुंबई) पोलीस ठाण्यांतील एकूण 4 गुन्हे केल्याची कबुली दिली. Thane Breaking News
अटक आरोपीकडून विविध कंपन्यांचे लॅपटॉप, आयफोन-14 प्रो, मनगटी घड्याळ आणि विविध कंपन्यांचे मोबाईल फोन असा एकूण 2 लाख 14 हजार किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
ही यशस्वी कामगिरी पोलीस उप आयुक्त अमरसिंह जाधव आणि सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन गायकवाड आणि त्यांच्या पथकाने पार पाडली आहे.


