Dombivli Tadipar News : डोंबिवली मनाई आदेश भंग करणारे आरोपीला अटक
Accused Get Tadiapar For 18 Month Away From Dombivli : आरोपीला अठरा महिन्याच्या कालावधीकरीता डोंबिवली शहरातून तडीपार केले होते
डोंबिवली :- पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे ( Thane CP Ashutosh Dumbare ) आणि पोलीस उप आयुक्त परिमंडळ-3 कल्याण यांची परवानगी न घेता शहरांमध्ये प्रवेश केला. मागील काही दिवसांपासून लोकसभेच्या निवडणुकीची घोषणा झाल्यापासून शहरातील गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले तसेच तडीपार आरोपींना पोलिसांनी अटक सत्र चालू केले आहे. निवडणुकीमध्ये शांतता व सुव्यवस्था अबाधित रावे या कारणास्तव गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या सर्व आरोपींना पोलिसांनी आता सहज आणि अटक सत्र चालू केले आहे. अशाच एका आरोपीला डोंबिवली पोलिसांनी अटक केली असून आरोपीला 18 महिन्याच्या ठाणे, या जिल्ह्यातून हद्दपार केले होते. Dombivli Tadipar News
आरोपी गणेश ऊर्फ बाळु आहिरे (22 वर्ष) याला पोलिसांनी 22 नोव्हेंबर 2023 पासून ठाणे जिल्ह्यातून हद्दपार केली होती. परंतु 25 मार्च च्या सायंकाळी कोणाचीही परवानगी न घेता डोंबिवलीच्या निलेश मेडिकल समोर शेलार नाका येथे आले असल्याचे पोलिसांना माहिती मिळाली. पोलिसांनी सापळा रचून आरोपीला अटक केली आहे. पोलिसांनी आरोपीची अंगझडती घेतली असता त्याच्याकडून पोलिसांना बेकायदेशीर येथे लोखंडे कोणता आढळला आहे.पोलिसांनी डोंबिवली पोलीस ठाणे सरकारतर्फे दिलेल्या फिर्यादीवरून आरोपीविरोधात महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 142,37(1),135 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. भारतीय हत्यार कायदा कलम 4,24 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तसेच आरोपी गणेश उर्फ गटल्या बाळु आहिरे यांना अटक केली असून पुढील तपास पोलीस हवालदार हासगुळे करत आहे. Dombivli Tadipar News