क्राईम न्यूजठाणेमुंबई
Trending

Vasai Virar News : वसई-विरारचे माजी आयुक्त अनिल पवार यांची अटक ‘बेकायदा’; पण ईडीच्या आरोपपत्रातील लाचेचे ‘गंभीर’ दावे

Vasai Virar Latest News : उच्च न्यायालयाने अनिल पवार यांना जामीन मंजूर करत अटकेचे समर्थन करण्यासाठी ठोस पुरावे नसल्याचे केले स्पष्ट

मुंबई :- वसई-विरार शहर महापालिकेचे Vasai Virar Municipal Corporation माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) केलेली अटक मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी बेकायदा ठरवत त्यांना दिलासा दिला आहे. पवार यांच्या अटकेचे समर्थन करण्यासाठी ईडीकडे कोणतेही ठोस पुरावे नसल्याचे सांगत उच्च न्यायालयाने त्यांची तातडीने सुटका करण्याचे आदेश दिले. ED raids Anil Pawar, the former commissioner of the Vasai-Virar Municipal Corporation

ईडीच्या आरोपपत्रातील गंभीर दावे

पवार यांना न्यायालयाने दिलासा दिला असला तरी, 10 ऑक्टोबर रोजी ईडीने दाखल केलेल्या आरोपपत्रात अनेक गंभीर आणि खळबळजनक आरोप केले आहेत.

ईडीच्या म्हणण्यानुसार, वसई-विरारमधील सरकारी जमिनीसह 41 निवासी आणि व्यावसायिक इमारतीच्या अवैध बांधकाम प्रकरणी केलेल्या कारवाईतून एकूण 300.92 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. यापैकी 169 कोटी रुपये अनिल पवार यांच्याशी संबंधित असल्याचा दावा ईडीने केला आहे.

‘लाच’ महागड्या भेटवस्तूंच्या स्वरूपात

व्हाट्सअप चॅटचा पुरावा: अवैध बांधकामांना मंजुरी देण्यासाठी लाच घेतल्याच्या आरोपांची चौकशी करताना, ईडीने दावा केला आहे की लाचेची रक्कम महागड्या भेटवस्तूंच्या खरेदीसाठी वापरली गेली. पवार आणि निलंबित माजी नगररचना उपसंचालक वाय. एस. रेड्डी यांच्या व्हॉट्सॲप चॅटवरून हे स्पष्ट होते.

भेटवस्तूंचा पाऊस: रेड्डी यांनी पवार यांच्या कुटुंबियांसाठी महागड्या साड्या, हिरेजडीत मौल्यवान दागिने, 70 हजार रुपयांचा पेन आणि आयफोन खरेदी केल्याचे चॅट स्क्रिनशॉटवरून दिसत आहे.

ऐषोआराम: आरोपपत्रानुसार, रेड्डी यांनी गुन्ह्यातून मिळालेले पैसे हॉटेल, क्रिकेट सामने, कॉन्सर्ट तिकिटे आणि परदेशी चलन खरेदीसाठी खर्च केले. एका विकासकाशी झालेल्या चॅटमध्ये रेड्डी यांनी त्यांचा मासिक खर्च 5 लाख असून, दिवाळीसारख्या सणांदरम्यान तो 1 कोटीपर्यंत वाढतो, असे नमूद केल्याचा आरोप आहे.

पवार यांच्या पत्नी आणि नातेवाईकांचा उल्लेख

माजी आयुक्त अनिल पवार आणि त्यांच्या पत्नी भारती पवार यांच्या नातेवाईकांमार्फत अवैध पैसे वळविण्यात आल्याचाही आरोप ईडीने केला आहे. हे पैसे रिअल इस्टेट कंपन्या, गोदामांच्या साखळ्या किंवा कन्सल्टन्सी सर्विसेसच्या माध्यमातून वळते केले गेले, जेणेकरून त्यांचा स्त्रोत निष्कलंक दाखवता येईल. पवार यांच्या पत्नी भारती यांना चार कंपन्यांकडून मासिक वेतन मिळत असल्याचेही दाखले देण्यात आले आहेत.

ईडीने एकूण 19 लोकांविरोधात हे आरोपपत्र दाखल केले आहे. यात माजी आयुक्त अनिल पवार, त्यांच्या पत्नी, वाय. एस. रेड्डी, माजी नगरसेवक सीताराम गुप्ता आणि अनेक बांधकाम व्यावसायिक, विकासक आणि वास्तुविशारद यांचा समावेश आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0