Navi Mumbai News : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन

• कमळाच्या आकारातील टर्मिनल; मुंबईची पहिली पूर्णपणे भूमिगत मेट्रो लाईन-2 बी चेही उद्घाटन
नवी मुंबई :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन केले. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे उद्घाटन मोदींच्या हस्ते पार पडले. यावेळी त्यांच्या स्वागतासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे उपस्थित होते. या सोहळ्यात उद्योगपती गौतम अदानी यांनीही पंतप्रधानांचे स्वागत केले.



नवी मुंबई विमानतळाची वैशिष्ट्ये
पहिला टप्पा: या पहिल्या टप्प्यात एक टर्मिनल आणि एक धावपट्टी तयार करण्यात आली आहे.
प्रवासी क्षमता: पहिल्या टप्प्याची क्षमता दरवर्षी दोन कोटी प्रवाशांना हाताळण्याची आहे.
टर्मिनलचे डिझाईन: विमानतळाचे टर्मिनल कमळाच्या आकाराच्या डिझाइनमध्ये विकसित करण्यात आले आहे.
उड्डाणे: या विमानतळावरून डिसेंबरमध्ये नियमित उड्डाणे सुरू होणार आहेत.
नामांतर: या विमानतळाला शेतकरी नेते डी. बी. पाटील यांचे नाव देण्यात आले आहे. हे मुंबईचे दुसरे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे.
मेट्रो लाईन-3 फेज 5 बी चेही उद्घाटन
या दौऱ्यात पंतप्रधान मोदी मुंबई मेट्रो लाईन 3 च्या फेज-2 बी चे उद्घाटन देखील करणार आहेत. मुंबईची पहिली पूर्णपणे भूमिगत मेट्रो लाईन (fully underground metro line) म्हणून या प्रकल्पाकडे पाहिले जात आहे. या प्रकल्पांच्या उद्घाटनामुळे मुंबई आणि नवी मुंबईच्या कनेक्टिव्हिटीला मोठा फायदा होणार आहे.


