ठाणे

Thane Crime News : ठाण्यात लाचखोर लिपिकाला थेट जेलची वाट – १ वर्ष सश्रम कारावास ठोठावला!

ठाणे जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचातील तत्कालीन कनिष्ठ लिपिक किशोर विश्वनाथ मानकामे (वय ६४, सध्या निवृत्त) हा फाईल दाखल करण्यासाठी लाच घेताना रंगेहात पकडला गेला. नागरिकांच्या हक्कांवर डल्ला मारणाऱ्या या लाचखोराला मा. विशेष सत्र न्यायालय, ठाणे यांनी तब्बल १ वर्ष सश्रम कारावास व दंड ठोकला.

प्रकरण काय?

“फाईल दाखल करायची असेल तर २०० रुपये द्यावे लागतील,” असे बिनधास्त सांगत मानकामे याने ५ फाईल्ससाठी तब्बल १००० रुपयांची लाच मागितली.
तक्रार मिळताच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून मानकामे याला पकडले.
आरोपीवर भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ अंतर्गत गुन्हा दाखल.

शिक्षेचा निकाल :
कलम ७ अंतर्गत – १ वर्ष सश्रम कारावास + १००० रुपये दंड (न भरल्यास १ महिना साधा कारावास)
कलम १३(१)(ड) सह १३(२) अंतर्गत – १ वर्ष सश्रम कारावास + १००० रुपये दंड (न भरल्यास १ महिना साधा कारावास)

तपास अधिकारी : पोलीस उपअधिकारी वाल्मिक पाटील
सरकारी अभियोक्ता : संजय मोरे

नागरिकांना आवाहन
“लाचखोरांविरोधात आवाज उठा!
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधा!
भ्रष्टाचार्यांचा पाडाव करणे हीच खरी सेवा!”

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0