क्राईम न्यूजठाणेमुंबई
Trending

Thane Drug Racket Busted : ठाण्यात मोठा अंमली पदार्थ सापळा!

Thane Police Busted Drug Racket : १ कोटी १० लाखांचा “चरस” जप्त, आंतरराष्ट्रीय रॅकेटची शक्यता

ठाणे : मुंबई-पुणे महामार्गालगत शिळफाटा परिसरात अंमली पदार्थ विरोधी पथकाने उचललेल्या धडक कारवाईने संपूर्ण ठाणे हादरले आहे.
१४ सप्टेंबर रोजी रात्री उशिरा अंमली पदार्थ विरोधी पथकाने गुप्त माहितीच्या आधारे लावलेल्या सापळ्यातून तब्बल १ किलो १०६ ग्रॅम वजनाचा “चरस” हा अमली पदार्थ जप्त करण्यात आला असून, जप्त मुद्देमालाची बाजारातील किंमत तब्बल ₹१,१०,८०,४२०/- रुपये इतकी आहे.

काळ्या धंद्याला आळा

गुप्त माहितीनुसार, शिळफाट्याकडून मुंब्रा बाजूने जाणाऱ्या वाहिनीवरील हावरे सिटीच्या नवीन बांधकामाजवळ पोलिसांनी काटेकोर जाळं टाकलं.
अचानक धडक कारवाईत मसुद बहुद्दीन ऐनरकर (वय २९, रा. दापोली) हा चालक व्यवसाय करणारा इसम पोलिसांच्या हाती लागला.
त्याच्या ताब्यात चरससह इतर साहित्य असा एकूण १ कोटी १० लाखांचा माल सापडला.

आंतरराष्ट्रीय तस्करीचा धागा?

प्राथमिक तपासात उघड झाले की, ऐनरकर हा चरस विक्रीसाठी घेऊन फिरत होता.
पोलिसांचा संशय आहे की हा माल विदेशातून तस्करी करून भारतात आणण्यात आला असावा.
मसुदने हा घातक पदार्थ कोणाकडून आणला, त्यामागे कोणते रॅकेट कार्यरत आहे याचा तपास सुरू आहे.
या प्रकरणात आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ तस्करीचे जाळे असण्याची दाट शक्यता तपासात समोर आली आहे.

शिळ-डायघर पोलीस स्टेशनमध्ये एन.डी.पी.एस. कायदा कलम ८(क), २०(ब)(पप)(क) अंतर्गत गुन्हा दाखल करून मसुद ऐनरकरला अटक करण्यात आली आहे.
त्याला २३ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली असून पुढील चौकशी सुरू आहे.

या धडाकेबाज कारवाईचे नेतृत्व उपआयुक्त अमरसिंह जाधव आणि सहाय्यक पोलीस आयुक्त रविंद्र दौंडकर यांच्या मार्गदर्शनाखाली
वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल मस्के व अंमली पदार्थ विरोधी पथकाने केले.
सपोनि सोमनाथ कर्णवर पाटील, निलेश मोरे, पोउपनि राजेंद्र निकम यांच्यासह पथकातील धाडसी जवानांनी रात्रीच्या अंधारातही निर्भय कारवाई करून कोट्यवधींचा मुद्देमाल जप्त केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0