Mira Bhayandar Police: जबराट कामगिरी करणाऱ्या 6 पोलिसांचा सन्मान, मिरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्त मधुकर पाण्डेय यांच्या हस्ते गौरव

Mira Bhayandar Police Latest News : पोलीस अधिकारी व अंमलदार यांचा आयुक्त मधुकर पाण्डेय यांच्याकडून सत्कार!
मिरा रोड :– मीरा-भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या पोलीस विभागात उत्तम कामगिरी, उल्लेखनीय सेवा करणाऱ्या सहा पोलीस अधिकाऱ्यांनी कर्मचारी यांचा पोलीस आयुक्त मधुकर पाण्डेय Mira Bhayandar CP यांच्याकडून सत्कार करण्यात आला आहे. राज्याच्या शंभर दिवस कृती आराखड्याच्या सात कलमी कार्यक्रमांतर्गत प्रशासनात लोकाभिमुखता आणण्याच्या दृष्टिकोनाने 7 जानेवारी ते 16 एप्रिल या कालावधीत कार्यालयीन सुधारणाची विशेष मोहीम राबवण्यात आली होती. भारतीय गुणवत्ता परिषद (QCI) स्वायत्त संस्थांमार्फत दिनांक करण्यात आलेले आहेत. राज्यस्तरावर केलेल्या टक्केवारी मीरा-भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाला एकूण गुणांपैकी 84.57 गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळवला होता. Mira Bhayandar Police Latest News



मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे Eknath Shinde यांच्या हस्ते पोलीस आयुक्त मधुकर पाण्डेय यांचा सत्कार करण्यात आला होता. मुख्यमंत्र्यांकडून त्यांना प्रशस्तीपत्रक देऊन गौरवण्यात आले होते. याच पार्श्वभूमीवर आयुक्तालयाच्या संवाद हॉल येथे मासिक गुन्हेगारीचा आढावा घेत पहिल्या तीन क्रमांकाच्या पोलीस ठाण्याला उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकाऱ्यांना गौरव करण्यात आले होते. त्यामध्ये मिरा रोड आणि काशिमीरा पोलिसांनी Kashmira Police Station प्रथम क्रमांक पटकावला आहे. वसई Vasai Police Station आणि मांडवी पोलिसांनी Mandvi Police Station व्दितीय आणि तृतीय क्रमांक पटकावला आहे. तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय जाधव, तुळींज पोलीस ठाणे, पोलीस निरीक्षक प्रमोद बडाख ( गुन्हे शाखा कक्ष-1), पोलीस निरीक्षक शाहूराज रणवरे (गुन्हे शाखा कक्ष-2), पोलीस निरीक्षक सुचितकुमार गुंजकर, सायबर पोलीस ठाणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी नाईक उत्तन सागरी पोलीस ठाणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे काशिमीरा पोलीस ठाणे यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.


