मुंबई

SpiceJet Flight News : मोठा अनर्थ टळला! चाक निखळलेल्या स्पाईसजेट विमानाचे मुंबईत यशस्वी लँडिंग

•75 प्रवाशांचा जीव वाचला; कांडला विमानतळावरून उड्डाण घेताच धावपट्टीवर सापडले चाक

ANI :- मोठी दुर्घटना थोडक्यात टळली आहे. गुजरातच्या कांडला येथून मुंबईला येणाऱ्या स्पाईसजेट कंपनीच्या बॉम्बार्डियर विमानाच्या बाहेरच्या बाजूचे एक चाक उड्डाणादरम्यानच निखळले. मात्र, वैमानिकाच्या कौशल्यामुळे आणि योग्य नियोजनामुळे 75 प्रवाशांसह या विमानाचे मुंबई विमानतळावर यशस्वी आणि सुरक्षित लँडिंग करण्यात आले आहे. यामुळे प्रवाशांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.

मुंबई विमानतळावर तात्पुरती आणीबाणी जाहीर; प्रवाशांनी सुटकेचा निःश्वास सोडला

12 सप्टेंबर रोजी स्पाईसजेटच्या क्यू 400 विमानाने कांडलाहून मुंबईकडे उड्डाण घेतले. विमान हवेत असतानाच, कांडला विमानतळाच्या धावपट्टीवर विमानाच्या बाहेरील बाजूचे एक चाक निखळलेले आढळले. ही माहिती तात्काळ मुंबई विमानतळावर देण्यात आली.

या गंभीर स्थितीची माहिती मिळताच, मुंबई विमानतळावर तातडीने आणीबाणी जाहीर करण्यात आली. आवश्यक त्या सर्व आपत्कालीन उपाययोजना करून विमानाला सुरक्षित लँडिंगसाठी मार्ग मोकळा करून देण्यात आला.

स्पाईसजेटच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, चाक निखळल्याची माहिती मिळूनही वैमानिकांनी अत्यंत कौशल्याने विमानाचे लँडिंग केले. सर्व ७५ प्रवासी सुखरूप असून, त्यांना सुरक्षितपणे विमानातून बाहेर काढण्यात आले आहे. या घटनेमुळे मुंबई विमानतळावरील इतर विमानांचे उड्डाण काही काळासाठी थांबवण्यात आले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0