मुंबई

Mumbai Police Bomblast Threats : मुंबई पोलिसांना व्हॉट्सॲपवर बॉम्बस्फोटाची धमकी; गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरात हाय अलर्ट

•‘34 वाहनांमध्ये बॉम्ब, 400 किलो आरडीएक्स’ असल्याचा दावा; सुरक्षा यंत्रणा सतर्क

मुंबई :- गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई शहरात मोठा तणाव निर्माण झाला आहे. मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षातील एका अधिकृत व्हॉट्सॲप नंबरवर शहरात बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी मिळाली आहे. या संदेशामुळे सुरक्षा यंत्रणेत खळबळ उडाली असून, मुंबई पोलिसांनी शहरात हाय अलर्ट जारी केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या धमकीच्या संदेशात अनेक गंभीर दावे करण्यात आले आहेत. त्यात 34 वाहनांमध्ये बॉम्ब लावण्यात आल्याचा उल्लेख आहे. तसेच, 400 किलो आरडीएक्स (RDX) भारतात आणल्याचा दावा करण्यात आला असून, त्याद्वारे एक कोटी लोकांना ठार मारण्याची क्षमता असल्याचे म्हटले आहे. याशिवाय, 14 पाकिस्तानी दहशतवादी भारतात घुसल्याचेही संदेशात नमूद केले आहे.

पोलीस यंत्रणा सतर्क, नागरिकांना आवाहन

या धमकीनंतर मुंबई पोलिसांनी तात्काळ पावले उचलली आहेत. शहरात सर्वत्र नाकाबंदी, संशयास्पद वाहनांची तपासणी आणि महत्त्वाच्या ठिकाणांवरील सुरक्षा वाढवण्यात आली आहे. गणेशोत्सवामुळे मोठ्या प्रमाणात भाविक शहरात येत असल्याने, पोलिसांनी सार्वजनिक गणेश मंडप, रेल्वे स्थानके, विमानतळ, बाजारपेठा आणि इतर गर्दीच्या ठिकाणी गस्त वाढवली आहे.
मुंबई पोलिसांच्या सायबर सेल आणि दहशतवादविरोधी पथकाने (ATS) या संदेशाची सत्यता तपासण्यासाठी तांत्रिक तपास सुरू केला आहे. अशा धमक्या अनेकदा खोट्या असल्या तरी, पोलिसांकडून कोणताही धोका पत्करला जात नाही. पोलिसांनी नागरिकांना कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. तसेच, कुठेही कोणतीही संशयास्पद वस्तू किंवा व्यक्ती आढळल्यास तात्काळ पोलिसांना माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0