देश-विदेश
Trending

एअर इंडिया विमान क्रॅश : 242 प्रवाशांचा मृत्यूची भीती

Air India Statement on Ahmedabad Flight Crash: गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी विमानात; लंडनला जाताना अहमदाबादमध्ये भीषण अपघात

ANI :- गुजरातच्या अहमदाबाद शहरात गुरुवारी (१२ जून) दुपारी एअर इंडिया कंपनीचं प्रवासी विमान AI-171 क्रॅश झालं. या विमानात एकूण 242 प्रवासी आणि कर्मचारी होते, ज्यामध्ये गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही समावेश असल्याचं समजतंय. दुर्घटना इतकी भीषण होती की सर्व प्रवाशांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

टेकऑफनंतर काही क्षणांतच काळाने गाठले

AI-171 विमानाने दुपारी 1.17 वाजता अहमदाबाद विमानतळावरून लंडनकडे उड्डाण घेतलं होतं. मात्र उड्डाण घेतल्यानंतर काहीच क्षणांत विमान विमानतळाच्या जवळ असलेल्या कार्गो ऑफिसवर आदळलं, आणि संपूर्ण इमारत उद्ध्वस्त झाली. दुर्घटनेमुळे आगीच्या ज्वाळा आणि धुराचे लोट दूरपर्यंत दिसत होते.

माहितीनुसार, माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी हे या फ्लाइटमधील बिझनेस क्लासमध्ये प्रवास करत होते. त्यांच्या कुटुंबातील सदस्य – पत्नी, मुलगी आणि इतर नातेवाईक – लंडनमध्ये वास्तव्यास आहेत. त्यांच्या भेटीसाठीच ते या विमानातून प्रवास करत होते.

या अपघातानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी तात्काळ हस्तक्षेप करत सर्वतोपरी मदतीचं आश्वासन दिलं आहे. विमानतळाच्या जवळ असलेल्या सिव्हिल हॉस्पिटलमधील सर्व डॉक्टरांची रजेवरून परत बोलावणी करण्यात आली असून, 50 हून अधिक एम्ब्युलन्स घटनास्थळी कार्यरत आहेत. मलब्याखालून जखमींना बाहेर काढून उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात येत आहे.

अपघात एवढा भयंकर होता की विमानाचे तुकडे दूरवर विखुरले गेले आहेत. मलब्याखाली अडकलेल्या प्रवाशांचा शोध घेण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन आणि अग्निशमन दल युद्धपातळीवर काम करत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0