मुंबई

Mumbai Crime News : चंदुकाका सराफ यांच्या GST सर्टिफिकेटचा गैरवापर करून ठकवणूक; आरोपी अटकेत, ३१.५८ लाखांची ज्वेलरी हस्तगत

मुंबई, २६ ऑगस्ट : एम.आय.डी.सी. पोलीस ठाणे, मुंबई यांनी मोठी कारवाई करत चंदुकाका सराफ (पुणे) यांच्या GST सर्टिफिकेटचा गैरवापर करून सोन्याच्या दागिन्यांची ठकवणूक करणाऱ्या एका इसमाला अटक केली असून, तब्बल ३१ लाख ५८ हजार रुपयांची ज्वेलरी १०० टक्के हस्तगत करण्यात आली आहे.

पोलीस तपासानुसार, आरोपीने स्वतःला Interational Gemological Institute (आंतरराष्ट्रीय हिरे परीक्षण संस्था) मधून बोलत असल्याचे भासवून सुप्रसिद्ध ज्वेलर्स चंदुकाका सराफ यांचा विश्वास संपादन केला. GST सर्टिफिकेट अपडेट करण्याच्या बहाण्याने त्याने त्यांचे दस्तऐवज मिळवले. त्यानंतर दागिने बनविणाऱ्या कंपन्यांना तो स्वतः चंदुकाका सराफ असल्याचे सांगत, नवे शोरूम सुरू करण्यासाठी दागिन्यांची ऑर्डर दिली.

गुन्हा क्र. ६३१/२०२५ : मनी ज्वेल्स एक्सपर्ट, अंधेरी (पूर्व) येथून २७ लाख रुपयांची सोन्या-हिर्‍यांची ज्वेलरी पोर्टर सेवेद्वारे मागवून ती बांद्र्यात स्वीकारली. गुन्हा क्र. ६३३/२०२५ : कलीस्ता ज्वेलर्स, महाकाली केव्हज रोड, अंधेरी (पूर्व) येथून ४ लाख ५८ हजार रुपयांची ज्वेलरी कुरिअरद्वारे मागवून ती पुण्यात स्विकारली. या प्रकारे आरोपीने एकूण ३१,५८,००० रुपयांची ठकवणूक केली होती.

तांत्रिक तपासातून यश

तांत्रिक व डिजिटल तपासाच्या आधारे आरोपीचा ठावठिकाणा मिळवून त्याला अटक करण्यात आली. दोन्ही गुन्ह्यातील सर्व दागिने १०० टक्के हस्तगत करण्यात यश आले आहे.

वरिष्ठांचे मार्गदर्शन

ही कारवाई पोलीस आयुक्त बृहन्मुंबई देवेन भारती, सह पोलीस आयुक्त (कावसु) सत्यनारायण, अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग परमजीतसिंह दहिया, उप आयुक्त परिमंडळ-१० दत्ता नलावडे, सहायक पोलीस आयुक्त अंधेरी विभाग गजानन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र वाणी यांच्या प्रत्यक्ष देखरेखीखाली करण्यात आली.
कारवाईत सपोनि यश पालवे, पो.ह. नलावडे, पो.शि. जाधव, माळी, पवार, जगताप यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0