मुंबई

Majhi Ladki Bahin Yojana Update : ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या 26 लाख लाभार्थ्यांची होणार तपासणी; अपात्र ठरल्यास कारवाई

•सरकारची योजनेतील पारदर्शकतेवर भर; महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांची माहिती

मुंबई :- राज्य सरकारची महत्त्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. या योजनेचा लाभ घेत असलेल्या सुमारे 26 लाख लाभार्थी योजनेच्या निकषांनुसार अपात्र असल्याचा प्राथमिक अहवाल माहिती व तंत्रज्ञान विभागाने (IT) दिल्यानंतर आता महिला व बालविकास विभागाने याची गंभीर दखल घेतली आहे. महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी याबाबत प्रेस नोट जारी करून माहिती दिली आहे.

या 26 लाख लाभार्थ्यांची यादी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये पडताळणीसाठी पाठवण्यात आली आहे. या लाभार्थ्यांची पात्रता तपासण्यासाठी स्थानिक पातळीवर सूक्ष्म छाननी सुरू आहे. या तपासणीतून त्यांची पात्रता किंवा अपात्रता स्पष्ट होणार आहे.

अदिती तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, या छाननीनंतर जे लाभार्थी अपात्र ठरतील, त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हा निर्णय घेतला जाईल.

तटकरे यांनी स्पष्ट केले की, या पडताळणीमध्ये जे लाभार्थी पात्र ठरतील, त्यांना योजनेचा लाभ यापुढेही पूर्वीप्रमाणेच मिळत राहील. या कारवाईमुळे योजनेतील पारदर्शकता वाढणार असून, खऱ्या गरजू महिलांनाच लाभ मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0