मुंबई

Panvel News : लोकनेते रामशेठ ठाकूर हे दानशूरता आणि लोकहिताचे मूर्तिमंत उदाहरण- भाजप प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण

पनवेल (हरेश साठे) : लोकनेते रामशेठ ठाकूर Ramseth Thakur हे दानशूरता आणि लोकहिताचे मूर्तिमंत उदाहरण आहेत. लोकांच्या दुःखात सहभागी होण्याबरोबरच आपल्या वैभवाचा उपयोग त्यांनी समाजकल्याणासाठी केला आहे, असे गौरवोद्गार राज्याचे माजी मंत्री आणि महाराष्ट्र प्रदेश भाजपचे कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी खांदा कॉलनी येथे ‘अमृतमयी कीर्तन’ महोत्सवात केले.
सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, अध्यात्मिक, सांस्कृतिक, वैद्यकीय अशा विविध समाजोपयोगी क्षेत्रात अग्रगण्य आणि दानशूर व्यक्तिमत्व माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा ०२ जून रोजी ७४ वा वाढदिवस असून ते अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण करीत आहेत. अमृत महोत्सव वर्षाची सुरुवात संतांच्या वाणीच्या गोडव्याने अर्थात ‘अमृतमयी कीर्तन महोत्सव २०२५’ ने झाली असून त्यानिमित्त आदरणीय गुरुतुल्य कीर्तनकार महाराजांचा सत्कार त्यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.


या सोहळ्याला माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, ज्येष्ठ नेते माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे, ज्येष्ठ नेते वाय. टी. देशमुख, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, दीपक बेहेरे, प्रल्हाद केणी, संजय भगत, अंनतबुवा महाराज पाटील, निलेश महाराज, तसेच आदरणीय गुरुतुल्य कीर्तनकार महाराज, आदी व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी हजारोंच्या संख्येने वारकरी संप्रदायातील मंडळी उपस्थित होती.


रवींद्र चव्हाण यांनी आपल्या भाषणात पुढे बोलताना सांगितले कि, व्यासपीठ आणि माझ्या समोर बसलेल्या सर्वांना त्यांच्याबद्दल माझ्यापेक्षा नक्कीच अधिक माहिती असेल परंतु अशी फार कमी माणसं असतात की जी माणसं दुसऱ्याच्या दुःखामध्ये सहभागी होत असतात पैसा बऱ्याच जणांकडे असतो पैसे बरेच जण वेगवेगळ्या मार्गातून कमवत असतात परंतु मला मिळालेले हे जे वैभव आहे या वैभवाचा मी खरा वाटेकरी नाही तर हे मला लोकांचे दुःख दूर कमी करण्यासाठी माझ्याकडे येतंय असा विचार करणारी फार कमी व्यक्ती आहेत. असे सांगून मी पाहिलेले असे दानशूर व्यक्तिमत्व जर कोणत असेल तर ते लोकनेते रामशेठ ठाकूर आहेत आणि हे मला अभिमानाने सांगावसं वाटते. अभिमान यासाठी वाटतो की अशा थोर व्यक्तींचा सहवास आणि या सहवासातून सुद्धा आपल्याला बरंच काहीतरी शिकता आले आहे. खरंतर अशी थोर मंडळी किंवा या मंडळींचा सहवास हा तुम्हा सर्वांना एक वेगळ्या पद्धतीचा एक आदर्श निर्माण करत असतो आणि तुम्हा आम्हाला आणि भावी पुढच्या पिढीला एक आदर्शवत असे त्यांचे व्यक्तिमत्व आहे. त्यांनी उचललेलं पाऊल आणि त्या पाऊल पडल्यानंतर त्यांना मिळालेले यश खरंतर कशामुळे मिळतं तर आज वयाच्या ७५ व्या वर्षीही सुद्धा कष्ट करण्याची जिद्द. त्यांनी एकदा ठरवलं की मला हे काम पूर्ण करायचा आहे तर ते काम पूर्ण करण्यासाठी त्यांची असणारी जिद्द चिकाटी आणि देण्यात येणारा वेळ आणि कामाचं नियोजन. आणि त्याच बरोबर आपल्या सोबत असणाऱ्या प्रत्येक छोट्या मोठ्या सर्व सहकाऱ्यांना घेऊन त्या कामाला सिद्धी पर्यंत पोहोचवण्यासाठी रात्रीचा दिवस करतात. एकदा संकल्प केला की त्याला सिद्धीस नेण्याचे काम ते करतात. त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये शिक्षक म्हणून सुरुवात केली एखादा शिक्षक म्हणून त्यांनी केलेली सुरुवात आणि आज या रायगड असेल किंवा ठाणे जिल्ह्यामध्ये ज्या वास्तु ज्याला ज्ञान मंदिर म्हटले जाते या ज्ञानमंदिराच्या निर्माण मध्ये त्यांनी केलेला योगदान हे महत्वपूर्ण असून आज हजारो विद्यार्थी विविध क्षेत्रांमध्ये असणारे विद्यार्थी आज उच्च शिक्षण घेत आहेत. दानशूरपणा, सामाजिक तळमळ अशा बऱ्याचशा गोष्टी त्यांच्याकडून शिकण्यासारख्या आहेत. त्यामुळे एक फार मोठा वारसा त्यांनी सर्वांना दिलेला आहे आणि हा वारसा जो आहे हा वारसा खऱ्या अर्थाने आपल्या पुढच्या पिढीने पुढे नेणं हे अत्यंत गरजेचे आहे. असेही त्यांनी नमूद केले. पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवींच्या ३०० व्या जयंतीच्या निमित्ताने सांगतो कि, परक्यांनी आपली असणारी श्रद्धास्थान त्यावेळच्या काळामध्ये भंग करण्याचं काम केले आणि त्यानंतरच्या काळामध्ये राजमाता अहिल्यादेवींनी मंदिरांचे जतन व संवर्धन करण्याचे काम केले. लोकनेते रामशेठ ठाकूर यांनीही रायगडसह जवळपासच्या असणाऱ्या या सर्व जिल्ह्यांमध्ये मंदिरांच्या निर्माणासाठी योगदान दिले आहे, या कीर्तन महोत्सवाच्या निमित्ताने वैष्णवांचा मेळा या ठिकाणी आहे. वारकरी सांप्रदाय आणि परंपरा टिकवून ठेवण्यासाठी यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची गरज असते. लोकनेते रामशेठ ठाकूर हे नेहमी या संत मंडळींच्या पाठीशी राहिले आहेत. त्यांच्याकडून विचार आणि आदर्शाचा वारसा मिळाला आहे, त्यामुळे लोकनेते रामशेठ ठाकूर यांना निरोगी दीर्घायुष्य लाभो हि ईश्वराकडे करतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0