Thane Crime News : अनैतिक व्यापार विरोधी कक्षाची कारवाई; ४ महिलांची सुटका, एक दलाल अटकेत

ठाणे, दि. २२ ऑगस्ट : अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष, गुन्हे शाखा ठाणे यांनी डोंबिवलीत सापळा रचून कारवाई करत वेश्या व्यवसायासाठी आणलेल्या ४ बळीत महिलांची सुटका केली असून, एका महिला दलालास ताब्यात घेण्यात आले आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैशाली गोरडे यांना गुप्त बातमीदारा मार्फत माहिती मिळाल्यानंतर अंबिका शुद्ध शाकाहारी रेस्टॉरंट, कोहिनूर कॉर्पोरेट बिल्डिंग, टाटा पावर लेन, डोंबिवली (पूर्व) येथे २२ ऑगस्ट रोजी दुपारी ४:१० वाजता छापा टाकण्यात आला.
या कारवाईनंतर पोहवा/२२६ विजय रामलाल पाटील यांच्या फिर्यादीवरून डोंबिवली पोलीस ठाण्यात गु.र.नं. ६५५/२०२५ भा.न्या.सं. २०२३ कलम १४३ (१), १४३ (३) सह अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम १९५६ चे कलम ४ व ५ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला.
सदर आरोपी महिला सध्या डोंबिवली पोलिसांच्या ताब्यात असून, सुटका करण्यात आलेल्या ४ महिलांना शांतीसदन, महिला सुधारगृह, उल्हासनगर-५ येथे ठेवण्यात आले आहे.


