मुंबई

Mumbai Crime News : सहार विमानतळावर लाच प्रकरणी कस्टम अधीक्षक सीबीआयच्या जाळ्यात

•मालाची मंजुरी देण्यासाठी 10 लाखांची लाच मागितल्याचा आरोप; रंगेहाथ पकडल्यानंतर पोलीस कोठडी

मुंबई :- सहार विमानतळावरील हवाई कार्गो विभागात कार्यरत असलेल्या सीमा शुल्क विभागाचे (कस्टम) अधीक्षक श्रीकृष्ण कुमार यांना केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) 10 लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक केली आहे. एका कस्टम हाऊस कंपनीकडून आयात केलेल्या मालाची मंजुरी (क्लिअरन्स) देण्यासाठी त्यांनी ही लाच मागितल्याचा आरोप आहे.

सीबीआयने दिलेल्या माहितीनुसार, अधीक्षक श्रीकृष्ण कुमार यांनी आयात मालाच्या वजनानुसार प्रति किलोमागे लाच मागितली होती. ही लाच त्यांनी स्वतःसाठी आणि आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी मागितल्याचा दावा तक्रारदाराने केला आहे. जेव्हा कंपनीने लाच देण्यास नकार दिला, तेव्हा अधिकाऱ्याने माल अडवून ठेवण्याची धमकी दिली, असे तक्रारीत म्हटले आहे. या प्रकारानंतर कंपनीने थेट सीबीआयकडे तक्रार केली.

तक्रारीची पडताळणी करण्यासाठी सीबीआयने 25 जुलै ते 1 ऑगस्ट दरम्यान स्वतंत्र साक्षीदारांच्या उपस्थितीत तपास केला. या तपासणीत, कुमार यांनी यापूर्वी मंजूर झालेल्या मालासाठी 6 लाख आणि नव्या मालासाठी 10 लाखांची मागणी केल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर, 2 ऑगस्ट रोजी सीबीआयने सापळा रचून श्रीकृष्ण कुमार यांना 10 लाख 20 हजार रुपयांची लाच घेताना अटक केली. ही रक्कम त्यांच्याकडून जप्त करण्यात आली आहे. आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले असून, त्याला 6 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0