मुंबई

Panvel Crime News : पनवेलमधील नाईट रायडर्स बार पुन्हा सुरू; मनसेच्या आंदोलनावर प्रश्नचिन्ह..!!

पनवेल महाराष्ट्र मिरर : मनसे कार्यकर्त्यांनी शनिवारी मध्यरात्री पनवेलमधील ‘नाईट रायडर्स’ बारवर आक्रमक कारवाई करत तोडफोड केली होती. राज ठाकरे यांच्या डान्स बारविरोधी वक्तव्यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी “छत्रपतींच्या पवित्र भूमीत डान्स बार चालू देणार नाही” असा इशारा देत बार उद्ध्वस्त केला. मात्र, अवघ्या काही तासांतच हा बार पुन्हा सुरू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मनसेच्या या आंदोलनाला स्थानिकांनी पाठिंबा दर्शवला असला, तरी बार पुन्हा सुरू होणे हे प्रशासनाच्या कारवाईतील ढिसाळपणाचे द्योतक मानले जात आहे.

स्थानिक नागरिकांमध्ये या प्रकारामुळे तीव्र नाराजी पसरली असून, मनसेच्या आंदोलनाचा हा केवळ दिखावा होता की खरोखरच कारवाईची मागणी होती, असा प्रश्न उपस्थित होत आहे. पोलिसांनी या प्रकरणी काही कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले असले, तरी बार मालकांवर कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. या घटनेने डान्स बारवरील बंदीच्या मुद्द्याला पुन्हा ताजे केले असून, सरकार आणि प्रशासन याबाबत किती गंभीर आहे, याबद्दल शंका निर्माण झाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0