महाराष्ट्रसांगली-मिरज
Trending

Harshal Patil : शासनाच्या दिरंगाईचा बळी! ‘जल जीवन मिशन’चे बिल थकल्याने तरुण कंत्राटदाराची आत्महत्या

Sangali Harshal Patil Suicide News : दीड कोटींचे बिल थकले; सांगलीतील हर्षल पाटील यांचा जीवनप्रवास संपला

सांगली: शासनाच्या दीड कोटी रुपयांच्या थकीत बिलामुळे एका तरुण कंत्राटदाराने आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना सांगली जिल्ह्यात घडली आहे. वाळवा तालुक्यातील तांदुळवाडी येथील 35 वर्षीय हर्षल पाटील यांनी आपल्या शेतात झाडाला गळफास घेऊन जीवन संपवले. जल जीवन मिशन योजनेची कामे करूनही बिल न मिळाल्याने ते प्रचंड तणावात होते, असे समोर आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हर्षल पाटील यांनी जल जीवन मिशन योजनेची कामे करण्यासाठी सावकाराकडून कर्ज घेतले होते. Sangali Harshal Patil Suicide News मात्र, काम पूर्ण होऊनही शासनाकडून दीड कोटी रुपयांचे बिल मिळाले नाही. यामुळे हर्षल पाटील मानसिकदृष्ट्या खचले आणि त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले.

जयंत पाटील यांचा सरकारवर हल्लाबोल

या घटनेनंतर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी ट्वीट करत राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. जयंत पाटील म्हणाले, “आज वाळवा तालुक्यातील तरुण, होतकरू हर्षल पाटील या अभियंता कंत्राटदाराने जलजीवन मिशनच्या केलेल्या कामाचे शासनाकडून पैसे मिळत नसल्याने, सरकारच्या त्रासाला व भ्रष्टाचाराला कंटाळून आत्महत्या केली. ही अत्यंत दुःखद घटना आहे. हर्षलला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्याच्या कुटुंबाच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.”

पाटील यांनी पुढे म्हटले की, “सरकारच्या रोजगार देण्याच्या खोट्या आश्वासनांना कंटाळून सर्वसामान्य शेतकऱ्यांची पोरं कंत्राटदारीकडे वळली. स्वतःच्या कष्टाच्या जोरावर आपलं विश्व निर्माण करू पाहणाऱ्या युवकांच्या स्वप्नांवर सरकारने पाणी फेरले.”

जयंत पाटील यांनी सरकारवर आरोप करताना म्हटले की, “राज्य शासनाने निवडणुका जिंकण्यासाठी तिजोरीत पैसे नसताना विविध कंत्राटांचे वाटप केले. आज थकलेली बिले घेण्यासाठी राज्यातील कंत्राटदार सरकारच्या दारात याचना व आंदोलने करत आहेत. ही एका खात्याची परिस्थिती नसून, सर्वच खात्यांची परिस्थिती आहे.”

या घटनेमुळे कंत्राटदारांच्या प्रश्नांकडे शासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. “एका कंत्राटदारावर केवळ एक घर चालत नसून त्याच्यावर अनेक कामगारांची कुटुंबे सुद्धा अवलंबून असतात, याचे सरकारला कसलेही भान राहिलेले नाही,” असे पाटील यांनी नमूद केले. “शेतकऱ्यांच्या आत्महत्यांप्रमाणे कंत्राटदारांच्या आत्महत्यांची मालिका सुरू होईल अशी मला भीती वाटते. या परिस्थितीवर सरकारने तात्काळ तोडगा काढावा,” अशी मागणी जयंत पाटील यांनी केली आहे. आता या आत्महत्येनंतर तरी सरकारला जाग येणार का, असा सवाल उपस्थित होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0